व्हॉट्सअॅपवर आता फोटो एडिट करण्याची सुविधा
By admin | Published: October 20, 2016 12:57 PM2016-10-20T12:57:49+5:302016-10-20T12:57:49+5:30
व्हॉट्सअॅपच्या नव्या फीचरमुळे आता फोटो किंवा व्हिडिओ पाठवताना त्यामध्ये टेक्स्ट किंवा इमोजीदेखील वापरता येणार आहे
Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि.4 - प्रसिद्ध इंस्टंट चॅट अॅप व्हॉट्सअॅपने आणखी एक फीचर अॅड केले आहे. या नव्या फीचरमुळे आता फोटो किंवा व्हिडिओ पाठवताना त्यामध्ये टेक्स्ट किंवा इमोजीदेखील वापरता येणार आहे. सध्या हे फीचर अँड्राईडवरच उपलब्ध आहे. हे फीचर iOS वर उपलब्ध होण्यासाठी काही वेळासाठी वाट पाहावी लागणार आहे.
विशेष म्हणजे स्मार्टफोनमध्ये आधीपासूनच असलेल्या फोटोंनाही टेक्स्ट किंवा स्माईली देता येणार आहे. एखादा फोटो किंवा व्हिडिओ सेंड करताना फोटो एडिटिंगचे ऑप्शन आपोआप तुमच्या मोबाईल स्क्रिनवर दिसेल. यानंतर तुम्ही तुमच्या आवडीचे इमोजी किंवा त्यामध्ये टेक्स्ट वापरु शकता.
फोटो एडिट करुन पाठवायचा असेल तर खाली असलेल्या कॅमेरा ऑप्शनवर क्लिक करा. त्यानंतर फोटो काढा किंवा सिलेक्ट करा. त्यानंतर उजव्या बाजूला फोटो एडिट करण्यासाठी ऑप्शन मिळतील. तुम्ही फोटोवर लिहूदेखील शकता तसंच इमोजीदेखील अॅड करु शकता. सोबतच व्हॉट्सअॅपने व्हिडिओ रेकॉर्डिंगसाठी झूमिंगचा देखील ऑप्शन उपलब्ध करुन दिला आहे.