आता निवृत्तीनंतरही मिळणार बढती

By admin | Published: February 2, 2015 01:20 AM2015-02-02T01:20:18+5:302015-02-02T01:20:18+5:30

आपल्या विभागाच्या बढतीबाबतच्या बैठकी लांबल्यामुळे बढतीपासून वंचित राहिलेल्या आणि याच काळात निवृत्त झालेल्या शासकीय कर्मचा-यांना

Now, after retirement, there will be an increase | आता निवृत्तीनंतरही मिळणार बढती

आता निवृत्तीनंतरही मिळणार बढती

Next

नवी दिल्ली : आपल्या विभागाच्या बढतीबाबतच्या बैठकी लांबल्यामुळे बढतीपासून वंचित राहिलेल्या आणि याच काळात निवृत्त झालेल्या शासकीय कर्मचा-यांना आता निवृत्तीनंतरही बढती मिळू शकेल़
कार्मिक व प्रशिक्षण विभागाच्या (डीओपीटी) एका अधिकाऱ्याने रविवारी याबाबत माहिती दिली़ विभागीय पदोन्नती समितीच्या बैठका लांबल्यामुळे पदोन्नतीपासून वंचित राहिलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांनाही बढतीचा लाभ देण्याचे निर्देश संबंधित मंत्रालय व विभागांना देण्यात आले आहेत. संबंधित वर्षात बढतीसाठी पात्र असताना केवळ डीपीसीची बैठक न झाल्यामुळे बढतीशिवाय निवृत्त व्हाव्या लागलेल्या कर्मचाऱ्यांना बढती लाभ न देणे योग्य ठरणार नाही. या आदेशाचे पालन करण्याचेही बजावले आहे़ (लोकमत न्यूज नेटवर्क)

Web Title: Now, after retirement, there will be an increase

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.