आता वायुदल होणार ‘आकाश’ यंत्रणेने सज्ज
By admin | Published: February 18, 2015 01:34 AM2015-02-18T01:34:38+5:302015-02-18T01:34:38+5:30
वायुदल आता ‘आकाश’ हवाई संरक्षण यंत्रणेने सुसज्ज होणार असून लवकरच सहा नव्या स्क्वॉड्रनची भर पडणार आहे
बेंगळुरू : वायुदल आता ‘आकाश’ हवाई संरक्षण यंत्रणेने सुसज्ज होणार असून लवकरच सहा नव्या स्क्वॉड्रनची भर पडणार आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संघटना(डीआरडीओ) भारत इलेक्ट्रॉनिक्स(भेल) आणि काही खासगी कंपन्यांच्या सहभागातून ‘आकाश’ची निर्मिती झाली आहे.
मोदी सरकारने ‘मेक- इन-इंडिया’चा नारा देण्यापूर्वीच आकाश यंत्रणा विकसित झाली असून पहिल्या टप्प्यातच तिची उपयोगिताही सिद्ध झाली आहे. वायुदलात सध्या कोणत्याही वातावरणात काम करणारी तसेच पॉर्इंट एरिया क्षेपणास्त्र यंत्रणा असलेल्या दोन स्क्वॉड्रन सेवेत आहेत. मोक्याच्या स्थळांचे रक्षण करण्याची, २० कि.मी.अंतरावरील लक्ष्याचा अचूक वेध घेण्यासाठी २५ ते ३० कि.मी. उंचीवर मारा करण्याची तसेच लढाऊ विमान किंवा युएव्हीसारख्याअतिवेगवान लक्ष्याला उद्ध्वस्त करण्याची क्षमता त्यात आहे. (वृत्तसंस्था)