आता आजी-आजोबाही करू शकणार पोस्टल बॅलेटने मतदान; दिल्लीपासून शुभारंभ
By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2020 05:50 PM2020-01-06T17:50:28+5:302020-01-06T17:53:21+5:30
दिल्ली विधानसबा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करताना टपाली मतदानाबाबतही निवडणूक आयुक्तांकडून मोठी घोषणा करण्यात आली आहे.
नवी दिल्ली - नवी दिल्ली विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाना आज जाहीर केला आहे. यावेळी निवडणुकीत अधिकाधिक मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी निवडणूक आयोगाने केलेल्या पूर्वतयारीची माहिती मुख्य निवडणुक आयुक्त सुनील अरोरा यांनी दिली. तसेच यावेळी टपाली मतदानाबाबतही निवडणूक आयुक्तांकडून मोठी घोषणा करण्यात आली आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने दिव्यांग आणि 80 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांनाही टपाली मतदानाने मतदानाचा हक्क बजावण्याची संधी देण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे.
यापूर्वी ठराविक विभागातील शासकीय अधिकारी आणि कर्मचारी तसेच सैन्यदल आणि पोलीस खात्यांमधील अधिकारी आणि कर्मचारी यांनाच टपाली मतदानाची सुविधा दिली जात असे. मात्र इतर सर्वसामान्य माणसांना टपाली मतदानाद्वारे मतदानाची संधी मिळत नसे. मात्र आता निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे दिव्यांग 80 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांनाही टपाली मतदानाने मतदानाचा हक्क बजावता येणार आहे.
CEC: New concept of absentee voters introduced,enables those voters to take part in polls who are not able to come to polling stations due to physical circumstances or unavoidable reasons. PWDs & Sr citizens above 80 yrs can either vote in person or vote through postal ballot https://t.co/bjc8itbo35
— ANI (@ANI) January 6, 2020
आज दुपारी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये निवडणूक आयोगाने दिल्ली विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. 70 सदस्यसंख्या असलेल्या दिल्ली विधानसभेसाठी 8 फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून, 11 फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे. मुख्य मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोडा यांनी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. निवडणूक आयोगाने निवडणुकीची तारीख जाहीर केल्यापासून दिल्लीत आचारसंहिता लागू झाली आहे.