विरूष्काने हनिमूनसाठी काश्मीरमध्ये यायला हवं होतं, आणखी एक भाजपा नेता बरळला
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2017 09:35 IST2017-12-21T09:34:27+5:302017-12-21T09:35:49+5:30
एकीकडे चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाच होत असता दुसरीकडे त्यांना सोशल मीडियावर ट्रोलही केलं जातं आहे. इतकंच नाही, तर काही राजकीय नेत्यांनीही विरूष्कावर टीका केली.

विरूष्काने हनिमूनसाठी काश्मीरमध्ये यायला हवं होतं, आणखी एक भाजपा नेता बरळला
नवी दिल्ली- टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यां दोघांनी इटलीमध्ये 11 डिसेंबर रोजी डेस्टिनेशन वेडिंग केलं. विरूष्कावर एकीकडे चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाच होत असता दुसरीकडे त्यांना सोशल मीडियावर ट्रोलही केलं जातं आहे. इतकंच नाही, तर काही राजकीय नेत्यांनीही विरूष्कावर टीका केली. भाजपा आमदार पन्ना लाल शाक्या यांनी विराटवर केलेल्या टीकेनंतर आता आणखी एका भाजपा नेत्याने विरूष्कावर टीका केली आहे. काश्मीरमधील भाजपाचे नेते रफिक वाणी यांनी विरूष्का विदेशात हनिमूनला गेल्याच्या मुद्द्यावर प्रश्न उपस्थित केला आहे.
विराट आणि अनुष्का ज्यांना त्यांचे चाहते प्रेमाने विरूष्का म्हणून संबोधित करतात ते हनिमूनसाठी फिनलँडला गेले. भारतात अनेक सुंदर जागा आहेत, ज्या जागांची हे जोडपं हनिमून डेस्टिनेशनसाठी निवड करू शकतं होतं. हनिमूनसाठी काश्मीर सगळ्यात सुंदर जागा आहे. जमिनीवर स्वर्ग काश्मीरला म्हटलं जातं. विरूष्काने हनिमूनसाठी काश्मीरला यायला हवं होतं. यामुळे आमच्या पर्यटनालाही प्रोत्साहन मिळालं असतं, अशी टीका रफिक वाणी यांनी केली आहे.
भाजपा आमदार भाजपा आमदाराने यांनीही केली होती विराटवर टीका
विराटने इटलीमध्ये लग्न केले त्यामुळे तो देशभक्त नाही. विराटने भारतात नाव आणि पैसा कमावला पण त्याने इटलीमध्ये लग्न केलं. भगवान राम, भगवान कृष्ण यांनी भारतामध्ये लग्न केलं पण विराटने लग्न इटलीत जाऊन केले. तो राष्ट्र भक्त असू शकत नाही असं भाजपा आमदार पन्ना लाल शाक्या म्हणाले. मध्य प्रदेशातील गुना मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतात.
कोहलीकडून कशी प्रेरणा घेणार, जे देशाप्रती एकनिष्ठ आहेत त्यांच्याकडून आपण प्रेरणा घेतो. अनुष्का शर्माला सुद्धा हीच बाब लागू पडते असं शाक्या म्हणाले. इटलीच्या नृत्यांगना भारतात येऊन करोडपती-अब्जोपती होतात. तेच कोहली देशाचा पैसा बाहेर घेऊन गेला.