आता अनुरागचा 'हरामखोर' सेन्सॉरच्या कात्रीत
By admin | Published: June 19, 2016 09:49 AM2016-06-19T09:49:40+5:302016-06-19T09:49:40+5:30
अनुराग कश्यपचा आणखी एक चित्रपट सेन्सॉरच्या कात्रीत सापडला आहे.'हरामखोर' चित्रपटाला प्रमाणपत्र द्यायला सेन्सॉर बोर्डाने नकार दिला आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १९ - 'उडता पंजाब' चित्रपटाच्या प्रदर्शनावरुन निर्माण झालेला वादाचा धुरळा आता कुठे खाली बसत असताना अनुराग कश्यपचा आणखी एक चित्रपट सेन्सॉरच्या कात्रीत सापडला आहे. अनुराग कश्यप निर्मित नवाझुद्दीन सिद्दीकीची प्रमुख भूमिका असलेल्या 'हरामखोर' चित्रपटाला प्रमाणपत्र द्यायला सेन्सॉर बोर्डाने नकार दिला आहे.
सेन्सॉरने चित्रपटाच्या कथानकावर आक्षेप घेतला आहे. चित्रपटामध्ये विद्यार्थिनी आणि शिक्षकाचा रोमान्स दाखवण्यात आला आहे. अनुराग फिल्म सर्टीफिकेशन न्यायाधिकरणाकडे दाद मागण्याचा विचार करत आहे.
समाजात शिक्षकाला आदराचे स्थान आहे आणि चित्रपटात विद्यार्थिनी आणि शिक्षकामध्ये संबंध दाखवले आहेत त्या आधारावर सेन्सॉरने प्रमाणपत्र द्यायला नकार दिला आहे. श्लोक शर्माने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. गुजरातमधील एका छोटया शहरात कथानक घडते. शिक्षक आणि किशोरवयीन विद्यार्थिनीमधील प्रेमकथा यात दाखवण्यात आली आहे.