Ladakh: आता रेंजांग लामध्ये घुसण्याचा प्रयत्न; भारत-चीनचे 40-50 जवान आमनेसामने
By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2020 02:58 PM2020-09-08T14:58:20+5:302020-09-08T15:44:37+5:30
India China Faceoff: सोमवारीही भारतीय जवानांनी आधी फायरिंग केल्याचा आरोप चीनने केला होता. मात्र, भारतीय लष्कराने आणि संरक्षण मंत्रालयाने चीनचा हा आरोप खोडून काढत चांगलेच सुनावले होते.
लडाख सीमेवर चीनकडून घुसखोरी करण्याचा आणि भारतीय जवानांना उकसविण्याचे जोरदार प्रयत्न चीनकडून सुरु झाले आहेत. गेल्या आठवड्यापासून चीन खूपच आक्रमक झाला असून सोमवारी सायंकाळी चीनने फायरिंगही केली आहे. तर नुकतीच पेंगाँग झीलच्या जवळ असलेल्या रेजांग लामध्ये कब्जा करण्यासाठी चीनचे सैनिक आले आहेत. या सैनिकांना भारतीय जवानांनी रोखल्याने तणाव वाढला आहे.
हा भाग भारताचा असून भारतीय जवानांच्या ताब्यात आहे. याठिकाणी चीनचे सैनिक आल्याने दोन्ही बाजुकडील 40 ते 50 सैनिक समोरासमोर उभे ठाकले आहेत. सोमवारी सायंकाळी चीनने लडाखमध्ये घुसखोरीचा प्रयत्न केला. जेव्हा भारताच्या जवानांनी त्यांना रोखले तेव्हा PLA च्या सैनिकांनी गोळीबार केला. हवेत गोळ्या झाडून त्यांनी भारतीय जवानांना घाबरविण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. मात्र, जवानांनी संयम ठेवत चीनच्या सैनिकांना परत हाकलून दिले.
मुंबईला पीओके बोलणे कंगनाला भोवले; विधानपरिषदेत हक्कभंग प्रस्ताव
30 ऑगस्टच्या घटनेनंतर चीनने चार ते पाचवेळा घुसखोरीचा प्रयत्न केला आहे. मात्र, दरवेळी भारतीय जवानांनी त्यांना तोडघशी पाडले आहे. यामुळे चीनकडून सातत्याने खोटारडेपणा सुरु असून भारतीय जवानांनीच घुसखोरी केल्याचा कांगावा चीन करत आहे.
सोमवारीही भारतीय जवानांनी आधी फायरिंग केल्याचा आरोप चीनने केला होता. मात्र, भारतीय लष्कराने आणि संरक्षण मंत्रालयाने चीनचा हा आरोप खोडून काढत चांगलेच सुनावले होते. भारतीय जवानांनी 30 ऑगस्टनंतर काला टॉप, हेल्मेट टॉप आणि पेंगाँगच्या काही उंच भागावर ताबा मिळविला आहे. यामुळे चीन अशा कुरापती करू लागला आहे. कारण ही शिखरे युद्धावेळी हालचाली करताना खूप महत्वाची आहेत. अशातच चीन ही शिखरे पुन्हा मिळविण्यासाठी प्रयत्न करत आहे.
महत्वाच्या बातम्या...
सुशांतचे 15 कोटी रुपये कुठे 'गायब' झाले? स्टिंग ऑपरेशनमध्ये मोठा खुलासा
निधड्या भारताची सिक्रेट फोर्स; मोदींच्या दूताची लडाखमध्ये शहीद जवानास मानवंदना
Video: भारताकडे अभेद्य शक्ती! DRDO ला मोठे यश; हाइपरसोनिक मिसाईलची चाचणी
Video: 100 लष्करी वाहने, 1000 सैनिक; घुसखोरीत हरले म्हणून चीनचा सीमेवर युद्धसराव