आता बाबा रामदेव पुरवणार "पराक्रमी" सुरक्षारक्षक

By admin | Published: July 10, 2017 05:36 PM2017-07-10T17:36:48+5:302017-07-10T17:37:40+5:30

योगगुरू बाबा रामदेव यांचा पतंजली समूह देशभरात दिवसेंदिवस विस्तारत आहे. योग आणि व्यापारामध्ये पाय घट्ट रोवलेले योगगुरू बाबा रामदेव यांनी

Now Baba Ramdev will provide a "mighty" protector | आता बाबा रामदेव पुरवणार "पराक्रमी" सुरक्षारक्षक

आता बाबा रामदेव पुरवणार "पराक्रमी" सुरक्षारक्षक

Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 10 - योगगुरू बाबा रामदेव यांचा पतंजली समूह देशभरात दिवसेंदिवस विस्तारत आहे. योग आणि व्यापारामध्ये पाय घट्ट रोवलेले योगगुरू बाबा रामदेव यांनी आणखी एका क्षेत्रात पदार्पण केलं आहे. आता बाबा रामदेव  कंपन्यांना सुरक्षारक्षक पुरवण्याचंही काम करणार आहेत. यासाठी पराक्रम सुरक्षा प्रायव्हेट लिमिटेडची स्थापना करण्यात आली आहे. ट्विटरद्वारे त्यांनी याची माहिती दिली. 
 
सोमवारी बाबा रामदेव यांनी ट्विटरद्वारे "पराक्रम सुरक्षा प्रायव्हेट लिमिटेड" आजपासून सुरू झाल्याची माहिती दिली. यामुळे देशात 25 ते 50 हजार तरूणांना रोजगाराची संधी उपलब्ध होईल असं ते म्हणाले. लवकरच देशातील अग्रगण्य सुरक्षारक्षक पुरवणा-या कंपन्यांमध्ये पराक्रम सुरक्षा प्रायव्हेट लिमिटेडचा समावेश होईल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे. "पराक्रम सुरक्षा, आपकी रक्षा" असं ब्रिद त्यांनी ठेवलं आहे.  
 

आणखी वाचा-

(बाबा रामदेव विकत घेणार NDTV?)

(...तर पाकिस्तानात जाऊन योगा शिकवेन- रामदेव बाबा)

(पाकिस्तानमधील गरिबी हटविण्यासाठी पतंजली प्रयत्न करणार - बाबा रामदेव)

बाबा रामदेव यांचा पतंजली समूह बैलांपासून करणार वीजनिर्मिती !

देशभरात दिवसेंदिवस विस्तार करणा-या बाबा रामदेव यांचा पतंजली समूह सध्या बैलांपासून वीजनिर्मिती करता येऊ शकते का, यावर संशोधन करत आहे. बैलांच्या बळाचा वापर करत वीजनिर्मिती करण्यावर पतंजली समूह गेल्या दीड वर्षांपासून संशोधन करतोय. पतंजलीचे व्यवस्थापकीय संचालक बालकृष्ण यांच्या कल्पनेवर आधारित असलेल्या प्रयोगाची गेल्या वर्षीच सुरुवात झाली आहे. या प्रयोगामध्ये देशातल्या एका मुख्य मल्टिनॅशनल मॅन्युफॅक्चरर आणि एका तुर्की कंपनीचाही सहभाग आहे. बैलांचा दिवसभरात शेतात उपयोग होते, तर संध्याकाळी वीजनिर्मितीसाठी वापर करता येऊ शकतो. प्राचीन काळात सामानाच्या दळणवळणासाठी बैलांचा सर्रास वापर केला जात होता. त्याच प्रमाणे तंत्रज्ञानाच्या मदतीने बैलांच्या ताकदीचा वापर केल्यास त्याचा आणखी चांगला उपयोग होऊ शकतो, असेही बालकृष्ण म्हणाले आहेत. बैलांपासून वीजनिर्मिती करण्याच्या प्रयोगासाठी एक प्रोटोटाइप डिझाइन तयार करण्यात आले आहे. बैलांचा वापर केल्यास सध्याच्या घडीला एक टर्बाईन असणाऱ्या डिझाईनमधून जवळपास 2.5 किलव्हॅट वीजनिर्मिती होऊ शकते. हरिद्वारमध्ये पतंजलीच्या प्रयोगशाळेत बैलांपासून वीजनिर्मिती करण्यावर संशोधन सुरू असल्याचं खात्रीलायक वृत्त आहे. महागडी वीज न परवडणा-या शेतक-यांसाठी बैलांपासून वीजनिर्मिती करण्याची योजना कामी येणार आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे.

Web Title: Now Baba Ramdev will provide a "mighty" protector

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.