बिहारमध्ये आता रेल्वे कुपनांचा सर्वपक्षीय घोटाळा

By admin | Published: June 27, 2016 04:28 AM2016-06-27T04:28:47+5:302016-06-27T04:28:47+5:30

भ्रष्टाचाराच्या विविध प्रकरणांनी गाजत असलेल्या बिहारमध्ये आणखी एक घोटाळा प्रकाशात आला आहे.

Now in Bihar, the Railway Kupnans' all-round scam | बिहारमध्ये आता रेल्वे कुपनांचा सर्वपक्षीय घोटाळा

बिहारमध्ये आता रेल्वे कुपनांचा सर्वपक्षीय घोटाळा

Next

एस.पी.सिन्हा,

पाटणा- भ्रष्टाचाराच्या विविध प्रकरणांनी गाजत असलेल्या बिहारमध्ये आणखी एक घोटाळा प्रकाशात आला आहे. रेल्वे कुपन घोटाळा हे त्याचे नाव असून कोणत्याही एका पक्षाच्या नव्हे तर भाजपसह सर्वच पक्षांच्या आमदारांचा त्यात असलेला सहभाग हे त्याचे वैशिष्ट्य ठरले आहे.
कॅगने अहवालात १० कोटींपेक्षा जास्त रकमेचा घोटाळा उघड केला असून आमदारांनी पक्षाभिनिवेश बाजूला सारत कूपनाच्या नावावर प्रवासभत्ता लाटत या घोटाळ्याला हातभार लावला. एकूण २२ आमदारांची ओळख पटली असून कॅगने विधानसभा सचिवांच्या भूमिकेबद्दलही गंभीर प्रश्न उपस्थित केला आहे. कॅगने २०१५-१६ च्या अहवालात बिहार विधानसभेकडून विविध समित्यांवर केलेला खर्च पाहता धक्कादायक तथ्य समोर आणले आहे. १७ समित्यांशी संलग्न आमदारांनी रेल्वे प्रवासाच्या नावावर घोटाळा घडवून आणला.
या आमदारांनी बिहार बाहेर दौरे करताना रेल्वे कूपनामार्फत मिळणाऱ्या रेल्वे तिकिटाचा (आरटीसी) प्रयोग करण्याचे टाळत कोणत्याही बिलाविना प्रवासभत्त्याचे कोट्यवधी रुपये पदरात पाडून घेतले.
संख्या वाढण्याची शक्यता
कॅगचा अहवाल नुकताच मिळाला असून तपासात आमदारांची संख्या वाढू शकते. नितीशकुमार यांच्या सरकारमधील अनेक मंत्री तसेच सत्ताधारी राजद व जदयूचे आमदार अडकण्याची शक्यता पाहता सरकारने कारवाई टाळण्याचे प्रयत्न चालवले आहेत.
दुसरीकडे कॅगच्या अहवालाच्या आधारावर मुझफ्फरपूरच्या विशेष निगराणी न्यायालयाने १८ आमदारांविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. या आमदारांनी प्रवासभत्त्याच्या नावावर सरकारी निधीचा दुरुपयोग केला आहे.

Web Title: Now in Bihar, the Railway Kupnans' all-round scam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.