आता देशातील १६ राज्यांत भाजपची सत्ता
By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2019 04:40 AM2019-11-27T04:40:59+5:302019-11-27T04:41:24+5:30
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा दिल्यानंतर एक राज्य भाजपच्या हातून निसटले आहे.
नवी दिल्ली : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा दिल्यानंतर एक राज्य भाजपच्या हातून निसटले आहे. तथापि, १६ राज्यांत सध्या भाजपची सत्ता आहे, तर १४ राज्य व केंद्रशासित प्रदेशात भाजपेतर पक्षांची सत्ता आहे.
भाजपची सत्ता असलेली राज्ये
गुजरात, उत्तर प्रदेश, आसाम, कर्नाटक, गोवा, अरुणाचल प्रदेश, उत्तराखंड, मणिपूर, हिमाचल प्रदेश, त्रिपुरा, झारखंड (निवडणूक जाहीर), बिहार (आघाडी), मिझारोम (मित्रपक्षासह), नागालँड (मित्रपक्षासह), हरयाणा (मित्रपक्षासह), मेघालय (मित्रपक्षासह).
भाजपेतर पक्षांची सत्ता
असलेली राज्ये
महाराष्ट्र, मध्य प्रदेश (काँग्रेस), राजस्थान (काँग्रेस), आंध्र प्रदेश (वायएसआर), तमिळनाडू (अभाअद्रमुक), तेलंगण (टीआरएस), ओदिशा (बिजद), पश्चिम बंगाल (तृणमूल काँग्रेस), पंजाब (काँग्रेस), छत्तीसगड (काँग्रेस), केरळ (माकप), दिल्ली (आप), सिक्कीम (एसकेएम), पुड्डुचेरी (काँग्रेस).