आता पाचवर्ष वयोगटाच्या आतील मुलांसाठी 'बाल आधार' कार्ड, जाणून घ्या या कार्डाचे महत्व...
By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2018 03:04 PM2018-02-26T15:04:57+5:302018-02-26T15:42:26+5:30
युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजेच यूआयडीएआयने आता बाल आधार कार्ड लाँच केले आहे. पाचवर्ष वयोगटाच्या आतील मुलांना निळया रंगाचे हे आधार कार्ड जारी केले जाणार आहे.
नवी दिल्ली - युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजेच यूआयडीएआयने आता बाल आधार कार्ड लाँच केले आहे. पाचवर्ष वयोगटाच्या आतील मुलांना निळया रंगाचे हे आधार कार्ड जारी केले जाणार आहे. या बाल आधार कार्डासाठी बायोमेट्रीक प्रक्रिया पूर्ण करण्याची गरज नाही. UIDAI ने त्यांच्या अधिकृत टि्वटर हँडलवरुन लागोपाठ टि्वट करुन ही माहिती दिली. मूल पाचवर्षांचे झाल्यानंतर बायोमेट्रीक पद्धतीने आधार कार्डकाढणे बंधनकारक असेल.
मूल पाचवर्षांचे झाल्यानंतर पालक जवळच्या आधार केंद्रात जाऊन बाल आधार कार्ड अपडेट करु शकतात. वयाच्या पाचव्या आणि पंधराव्यावर्षी बायोमेट्रीक पद्धतीने अपडेट करणे बंधनकारक आहे. आधार कार्ड अपडेट करण्यासाठी कुठलेही शुल्क आकारण्यात येणार नाही ते पूर्णपणे मोफत असेल. मुलगा किंवा मुलीच्या शाळेतील ओळखपत्राच्या आधारेही बाल आधार कार्ड काढता येऊ शकते. सर्वसामान्यांना माहिती मिळावी यासाठी यूआयडीएआयने निळया रंगाच्या आधार कार्डांची काही इन्फोग्राफीक्सही पोस्ट केली आहेत.
एक ते पाचवर्ष वयोगटासाठी आधारकार्ड बंधनकारक नाहीय. परदेशातील शैक्षणिक कार्यक्रम आणि अन्य सरकारी स्कॉलरशिपसाठी बाल आधारकार्ड उपयुक्त ठरु शकते. बायोमेट्रीक पद्धतीने आधार कार्ड अपडेट करताना हातांच्या बोटांचे ठसे, डोळयांची बुबुळे आणि चेहऱ्याचा फोटो घेतला जाईल. वयाच्या 15 व्या वर्षीही अशाच पद्धतीनेच आधार अपडेट होईल. आधार कार्ड विविध सरकारी योजनांशी जोडण्यावरुन अजून वादविवाद सुरु आहेत.
A child below 5 years of age gets a blue in coloured Aadhaar known as Baal Aadhaar. When the child becomes 5 yr old, a mandatory biometric update is required. #AadhaarForMyChildpic.twitter.com/5IBZRuo7Tr
आता तुमचा चेहरा बनणार आधार
युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियानं ज्येष्ठ लोकांच्या पडताळणीसाठी नवी योजना आणली आहे. ब-याचदा वयोमानानुसार वयोवृद्ध लोकांच्या अंगठ्याचे ठसे नाहीसे होतात. त्यामुळे त्यांची आधार कार्ड पडताळणी करणे अवघड जाते. परंतु UIDAIने आता अशा लोकांची चेह-याच्या माध्यमातून पडताळणी करण्याची योजना आणली आहे. त्यामुळे अंगठ्याचे ठसे जरी नाहीसे झाले असले तरी आता तुम्हाला चेह-याचा आधार मिळणार आहे. सरकारनं वयोवृद्ध लोकांना बँक खातं उघडण्यासह सरकारी योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी चेह-याची ओळख पडताळणी करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. ही सुविधा 1 जुलै 2018पासून लागू होणार आहे.