आता 43 देशांतील नागरिकांना ई-व्हिसा
By admin | Published: November 28, 2014 12:12 AM2014-11-28T00:12:39+5:302014-11-28T00:12:39+5:30
अमेरिका, जर्मनी आणि इस्नयल यासह 43 देशांतील पर्यटकांना आता भारताचा ई-व्हिसा मिळविण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
Next
नवी दिल्ली : अमेरिका, जर्मनी आणि इस्नयल यासह 43 देशांतील पर्यटकांना आता भारताचा ई-व्हिसा मिळविण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ई-व्हिसासाठी अर्ज केल्यानंतर 3क् दिवसांच्या आत विदेशी पर्यटकांना भारतात प्रवेश करता येणार आहे. गुरुवारी या बहुप्रतीक्षित योजनेचा प्रारंभ झाला.
गृहमंत्री राजनाथसिंग आणि पर्यटनमंत्री महेश शर्मा यांच्या हस्ते सुविधेचे उद्घाटन झाले. पहिल्या टप्प्यात रशिया, ब्राझील, युक्रेन, जॉर्डन, नॉव्रे, जर्मनी, थायलंड, संयुक्त अरब अमिरात, मॉरिशस या देशांच्या पर्यटकांना या सुविधेचा लाभ मिळेल. ई-व्हिसाअंतर्गत भारतीय दूतावासाकडून ई-मेलद्वारे इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पर्यटन परवानगी दिली जाते. व्हिसा प्राप्त केल्यानंतर विदेशी पर्यटकांना 3क् दिवस भारतात राहण्याची परवानगी मिळणार
आहे.
आम्हाला देशात मोठय़ा प्रमाणात पर्यटनाला प्रोत्साहन द्यायचे आहे. देशातील पर्यटनाचे सकल राष्ट्रीय उत्पादनात योगदान सुमारे 7 टक्के असून आम्हाला ते दुप्पट करायचे आहे, असे केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंग यांनी ‘ई-व्हिसा’ सुविधा जारी करताना स्पष्ट केले.
ई-व्हिसा सुविधेमुळे व्हिसा प्राप्त करण्यासाठी आता विदेशी पर्यटकांना भारतीय वकिलातीत जाण्याची गरज नाही. विदेशी पर्यटकांना ऑनलाईन शुल्क भरता येईल. ई-व्हिसा सुविधा देशातील 9 आंतरराष्ट्रीय विमानतळांवर देण्यात येईल. यात दिल्ली, मुंबई, चेन्नई, कोलकाता, हैदराबाद, बंगळुरू, कोची, तिरुवअनंतपूरम आणि गोवा विमानतळांचा समावेश आहे. वर्षातून दोन वेळा विदेशी पर्यटकांना या सुविधेचा लाभ घेता येणार आहे.
राजनाथ सिंग म्हणाले, प्राचीन काळापासून जगभरातील लोकांना भारतीय अध्यात्म व तत्त्वज्ञान याबद्दल प्रचंड आकर्षण आहे. या सुविधेमुळे पर्यटक संस्थांना विदेशी नागरिकांना सुरक्षित आणि पूरक वातावरण देण्यास मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
4प्राथमिक यादीतील काही देश वगळता इतर सर्व देशांना आगामी 2 वर्षामध्ये ही सुविधा देण्याचा प्रय} राहणार आहे.
4पाकिस्तान, सुदान, अफगाणिस्तान, इराण, इराक, नायजेरिया, श्रीलंका आणि सोमालिया हे देश वगळता इतर सर्व देशांना टप्प्याटप्प्याने ई-व्हिसाची सुविधा मिळेल.
4या सुविधेमुळे देशात विदेशी पर्यटकांची संख्या वाढेल, अशी अपेक्षा आहे. यंदा जानेवारी ते सप्टेंबर या काळात सुमारे 51.79 लाख विदेशी पर्यटकांनी भारताला भेट दिली. सध्या दक्षिण कोरिया, जपान, फिनलँड, सिंगापूर, न्यूझीलंड, इंडोनेशिया, म्यानमार, व्हिएतनाम आणि लाओससह 13 देशांच्या पर्यटकांना आगमनानंतर व्हिसा देण्यात येतो.