आता लवकरच येणार ‘एक देश, एक कॅलेंडर’; राष्ट्रपती करणार प्रकाशन

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2024 09:33 AM2024-02-12T09:33:05+5:302024-02-12T09:33:20+5:30

नव्या पंचांगामुळे देशातील सण-उत्सवांच्या तिथीवरून होणारा गोंधळ दूर होईल.

Now coming soon 'One Country, One Calendar'; Publication by the President | आता लवकरच येणार ‘एक देश, एक कॅलेंडर’; राष्ट्रपती करणार प्रकाशन

आता लवकरच येणार ‘एक देश, एक कॅलेंडर’; राष्ट्रपती करणार प्रकाशन

भोपाळ : देशात विविध सण, उत्सवावेळी असलेल्या वेगवेगळ्या तिथीवरून दरवर्षी गोंधळ होतो. एका राज्यात वेगळी, तर दुसऱ्या राज्यात वेगळ्या दिवशी सण साजरा केला जातो, सुटीही वेळवेगळ्या दिवशी दिली जाते. त्यावरून होणारा गोंधळ टाळण्यासाठी एक देश, एक कॅलेंडरच्या धर्तीवर एकसंध हिंदू पंचांग तयार केले जात आहे. त्याची जबाबदारी केंद्रीय संस्कृत विद्यापीठाकडे देण्यात आली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते लवकरच या पंचांगाचे प्रकाशन होणार आहे.

नव्या पंचांगामुळे देशातील सण-उत्सवांच्या तिथीवरून होणारा गोंधळ दूर होईल. नवे पंचांग हे देशातील सर्व पंचांगांचा अभ्यास करून नक्षत्र, योग, सूर्य आणि चंद्राच्या गतीच्या आधारे तयार करण्यात आल्याचे ज्योतिषाचार्यांनी म्हटले आहे. 

माेबाइल ॲपही येणार
सुरुवातीला हे पंचांग केवळ केंद्रीय संस्कृत विद्यापीठापुरतेच मर्यादित होते. परंतु नंतर ते सर्वत्र वापरात आणण्याचा निर्णय झाला. तसेच अधिकाधिक लोकांपर्यंत ते पोहोचविण्यासाठी ॲपही विकसित केले जात असल्याचे सांगण्यात आले.
 

Web Title: Now coming soon 'One Country, One Calendar'; Publication by the President

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.