आता धीरेंद्र शास्त्री 'सेना' बनवणार, काय काम करणार? का म्हणाले महाकुंभ मेळा उद्देशापासून भटकतोय? जाणून घ्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2025 21:25 IST2025-01-20T21:23:15+5:302025-01-20T21:25:34+5:30
धीरेंद्र कृष्ण शास्त्री म्हणाले, महाकुंभात सनातन कसे टिकेल, यावर चर्चा व्हायला हवी. हिंदुत्व कसे जागृत होईल? हिंदू राष्ट्र कसे निर्माण होईल? हिंदूंची घर वापसी कशी होईल? यावर काम व्हयला हवे...

आता धीरेंद्र शास्त्री 'सेना' बनवणार, काय काम करणार? का म्हणाले महाकुंभ मेळा उद्देशापासून भटकतोय? जाणून घ्या
बागेश्वर धामचे पीठाधीश्वर धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी महाकुंभ मेळ्यासंदर्भात मोठे विधान केले आहे. महाकुंभ आपल्या उद्देशापासून भरकटत आहे. महाकुंभ हा व्हायरल होणारा विषय नाही. महाकुंभमेळा हा श्रद्धा आणि संस्कृतीचा प्रचार करण्याचा विषय आहे. महाकुंभ हा रीलसाठी नव्हे, तर रिअलसाठी ओळखला जातो. गेल्या अनेक दिवसांपासून मी बघतोय, महाकुंभ मेळ्यातील अनेक लोकांच्या रील्स व्हायरल होत आहेत. मी याच्या बाजूने नाही. मी याचा विरोध करतो. महाकुंभ मेळ्यात चर्चा व्हायला हवी.
महाकुंभ मेळ्यात चर्चा व्हायला हवी -
धीरेंद्र कृष्ण शास्त्री म्हणाले, महाकुंभात सनातन कसे टिकेल, यावर चर्चा व्हायला हवी. हिंदुत्व कसे जागृत होईल? हिंदू राष्ट्र कसे निर्माण होईल? हिंदूंची घर वापसी कशी होईल? यावर काम व्हयला हवे.
महाकुंभमेळ्यात कार्यक्रमाची घोषणा -
धीरेंद्र कृष्ण शास्त्री म्हणाले, ते कुंभ मेळ्यात जात आहेत. तेथे एक कार्यक्रम होईल. या कार्यक्रमाचा संकल्प 'हिंदूंना जगओ, हिंदुस्तान बचाओ', असा असेल. धीरेंद्र कृष्ण शास्त्री पुढे म्हणाले, सध्या परदेशी शक्तींकडून भारतात धर्मांतरणाला प्रोत्साहित केले जात आहे. देशातील छत्तीसगड, मध्य प्रदेश, केरळ, तेलंगाणा, ओडिशा आणि आसाम सारख्या राज्यात प्रलोभने देऊन हिंदूंचे धर्मांतरण केले जात आहे.
हनुमान चालीसा बागेश्वर मंडळं तयार केली जाणार -
धीरेंद्र कृष्ण शास्त्री पुढे म्हणाले, जर भारताला हिंदू राष्ट्र बनवायचे असेल तर सर्वप्रथम आपल्याला हिंदूंचे धर्मांतर थांबवावे लागेल. यासाठी आम्ही एक नवीन प्रतिज्ञा घेतली आहे. हिंदू धर्माचे रक्षण करण्यासाठी जिल्हा, गाव आणि वसाहत पातळीवर 'हनुमान चालीसा बागेश्वर मंडळ' स्थापन केले जाणार. जर भविष्यात, रस्त्यावर उतरायची वेळ आलीच, तर हनुमान चालीसा बागेश्वर मंडळाचे भक्त, सदस्य आणि स्वयंसेवक एखाद्या 'सेने'च्या स्वरुपात रस्त्यावर उतरण्यासाठी तयार असतील. यात आदिवासी समाजाची प्रमुख भूमिका असेल. यांद्वारे आपण देशभरातील आदिवासींना धर्मांतराच्या विरोधात एकत्र करू.