आता आधार कार्ड खिशात नाही मोबाईलमध्ये घेऊन फिरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2017 04:09 PM2017-07-19T16:09:25+5:302017-07-19T16:15:20+5:30
एखाद्या महत्वाच्या कामासाठी गेला असाल आणि आधार कार्ड घरीच राहिलं असेल तर...
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 19 - एखाद्या महत्वाच्या कामासाठी गेला असाल आणि आधार कार्ड घरीच राहिलं असेल तर...अशी परिस्थिती निर्माण झाली तर यापुढे घाबरायची गरज नाही. पण यासाठी तुमचा मोबाईल फोन सोबत असणं गरजेचं आहे. कारण आता तुमचं आधार कार्ड मोबाईल फोनमध्ये ठेवणं शक्य असणार आहे. यामुळे नेहमी आधार कार्ड खिशात घेऊन फिरण्याची गरज राहणार नाही. आधार कार्ड जारी करणा-या यूनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडियाने (UIDAI) mAadhaar नावाचं एक अॅप लॉन्च केलं आहे. यामुळे आधार कार्ड नेहमी आपल्या मोबाईलमध्ये ठेवणं शक्य होणार आहे.
संबंधित बातम्या
सध्या हे अॅप फक्त अॅड्रॉईडसाठी उपलब्ध आहे. या अॅपच्या माध्यमातून युजर्स आपलं आधार प्रोफाईल ओळखपत्राप्रमाणे फोनमध्ये ठेवू शकतात. इतकंच नाही तर आधार कार्डशी संबंधित किती बायोमेट्रिक माहिती अॅपसोबत शेअर करायची हेदेखील आपल्याच हातात असणार आहे.
याशिवाय अॅपच्या माध्यमातून क्यूआर कोडच्या सहाय्याने आधार प्रोफाईल पाहता येऊ शकतो, तसंच ईकेवायसी डिटेल्सही शेअर करु शकणार आहोत. mAadhaar अॅप गुगल प्लेस्टोअरमधून डाऊनलोड केलं जाऊ शकतं. मात्र यासाठी आधारशी संबंधित नंबर असणं गरजेचं आहे.
Download #mAadhaar from https://t.co/6o4DdtWs3B on any android phone running on Android 5.0 & up. Registered Mob. No. required to sign-up. pic.twitter.com/J60Q5vC7M2
— Aadhaar (@UIDAI) July 19, 2017
यूनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडियाने (UIDAI) हे अॅप बीटा व्हर्जन असल्याचं सांगितलं आहे. म्हणजे हे अॅप अद्यापही विकसित केलं जात असून सध्या त्याचा वापर करण्यामध्ये काही अडचणी येऊ शकतात. अॅपमध्ये सध्या काही त्रुटी असून प्लेस्टोअरवर युजर्सनी देखील तक्रारींची नोंद केली आहे.
आधार कार्ड प्रकरण 9 सदस्यीय घटनापीठाकडे
सर्वोच्च न्यायालयाने आधार कार्ड प्रकरणी सुनावणी करताना नऊ सदस्यीय घटनापीठाकडे हे प्रकरण सोपवलं आहे. आधारकार्ड पॅनकार्डशी लिंक करणं हे व्यक्तिगत स्वातंत्र्याचं उल्लंघन आहे का हे जाणून घेण्यासाठी 9 सदस्यांचं घटनापीठ दोन दिवस सर्व बाजू जाणून घेण्याचा प्रय़त्न करणार आहे. यापुर्वी पाच न्यायाधीशांचं खंडपीठ या प्रकरणी सुनावणी करणार होतं. मात्र, न्यायालयाने हे प्रकरण 9 सदस्यीय घटनापीठाकडे सुपूर्द केलं.
इन्कम टॅक्स रिटर्न नियमांच्या बदलासंदर्भात केंद्र सरकारने अधिसूचना जारी करत आधारकार्ड पॅनकार्डशी लिंक करणं अनिवार्य केलं होतं. याविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. यावरील सुनावणी दरम्यान, ‘आधारकार्ड पॅनकार्डशी लिंक केल्यास कुणाच्या व्यक्तिगत स्वातंत्र्याचं उल्लंघन होईल का? असा सवाल सुप्रीम कोर्टानं सवाल उपस्थित केला होता. त्यामुळे खरंच आधारकार्ड पॅनकार्डशी लिंक करणं हे व्यक्तिगत स्वातंत्र्याचं उल्लंघन आहे का हेच जाणून घेण्यासाठी सुप्रीम कोर्टानं नऊ सदस्यीय घटनापीठाकडे हे प्रकरण सुपूर्द केलं आहे.