आता लुटा दुमजली रेल्वे प्रवासाचा आनंद
By admin | Published: April 25, 2017 12:51 AM2017-04-25T00:51:33+5:302017-04-25T00:51:33+5:30
रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर आहे. भारतीय रेल्वे येत्या जुलैपासून ‘उदय’ एक्स्प्रेस’ (उत्कृष्ट डबल डेकर एसी यात्री एक्स्प्रेस-उदय) सुरू करणार असून
नवी दिल्ली : रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर आहे. भारतीय रेल्वे येत्या जुलैपासून ‘उदय’ एक्स्प्रेस’ (उत्कृष्ट डबल डेकर एसी यात्री एक्स्प्रेस-उदय) सुरू करणार असून, त्यामुळे प्रवाशांना थर्ड एसीहूनही कमी भाड्यात रात्रीचा आरामदायी प्रवास करता येणार आहे. अशा गाड्यांची घोषणा रेल्वे अर्थसंकल्पात करण्यात आली होती.
गर्दीच्या मार्गांवर अशा गाड्या सुरू करण्याचा विचार आहे. आरामदायक खुर्च्यांनी सुसज्ज, १२० आसनी एसी डब्ब्यांत स्वयंचलित यंत्राद्वारे (व्हेंडिंग मशीन) प्रवाशांना जेवण, चहा आणि शीतपेये पुरविली जातील. उदय एक्स्प्रेस दिल्ली-लखनौ यासारख्या अधिक मागणी असलेल्या मार्गांवर धावणार असून, नियमित गाड्यांच्या थर्ड एसीच्या तुलनेत उदयचे भाडे कमी असेल.
सर्व डब्यांत वायफाय स्पीकरप्रणालीयुक्त मोठ्या स्क्रीनचे एलसीडी टीव्ही असतील. या रेल्वे इतर रेल्वेंच्या तुलनेत ४० टक्के अधिक प्रवासी वाहून नेऊ शकतील. त्यामुळे अधिक गर्दीच्या मार्गावरील भार कमी होण्यास मदत होईल. रात्री धावणार असूनही या गाडीचा स्लीपर बर्थ नसेल. त्याऐवजी अनेक सुविधा देऊन प्रवास सुलभ करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. ही रेल्वे ताशी ११० कि. मी. प्रति वेगाने धावणार आहे.