आता हाफिज आणि दाऊदला संपवा - बाबा रामदेव
By admin | Published: October 6, 2016 12:36 PM2016-10-06T12:36:10+5:302016-10-06T12:47:23+5:30
भारतीय लष्कराने आता मॉस्ट वॉन्टेड दहशतवादी हाफिज सईद आणि दाऊद इब्राहिमला संपवण्याचे लक्ष्य ठेवले पाहिजे, असे वक्तव्य योगगुरू बाबा रामदेव यांनी केले आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 6 - भारतीय लष्कराने आता मॉस्ट वॉन्टेड दहशतवादी हाफिज सईद आणि दाऊद इब्राहिमला ठार केले पाहिजे, असे वक्तव्य योगगुरू बाबा रामदेव यांनी केले आहे. या दोघांना मारल्यानंतर जगात शांतता नांदेल, आणि ही कारवाई केल्यास पंतप्रधान मोदी लोकांच्या नेहमी लक्षात राहतील, असेही त्यांनी म्हटले आहे. 'द टाईम्स ऑफ इंडिया'ने यासंबंधीचे वृत्त दिले आहे. भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्मीरमध्ये सर्जिकल स्ट्राईक केल्याबाबत त्यांचे कौतुक करत, बाबा रामदेव यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्यावर ताशेरे देखील ओढले आहेत.'पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विश्वासघात केला आहे. त्यामुळे पाकिस्तानसोबत चर्चा करण्यात काही अर्थ नाही', असे बाबा रामदेव यांनी म्हटले आहे. तसेच त्यांनी नवाज शरीफ यांचा 'नपुंसक' असा उल्लेख करत शरीफ हे पाकिस्तानी लष्कराच्या हातातील 'कठपुतळी' असल्याची टीका देखील केली आहे.
आणखी बातम्या
यावेळी त्यांनी भारतात पाकिस्तानी कलाकारांवर घातलेल्या बंदीचे समर्थन केले. तसेच पाकिस्तानी कलाकारांना पाठिंबा दर्शवणारा बॉलिवूड अभिनेता सलमान खानला चांगलेच फटकारले. 'पाकिस्तानी कलाकारांची एवढीच काळजी असेल तर त्याने पाकिस्तानात भारतीय कलाकार आणि सिनेमांवरील बंदी हटवण्यासाठी प्रयत्न करावे', अशा शब्दांत त्यांनी सलमानला सुनावले आहे.