आता "फायरबॉल"चा धुमाकूळ

By Admin | Published: June 3, 2017 06:36 PM2017-06-03T18:36:00+5:302017-06-03T18:36:00+5:30

नुकतेच काही दिवसापूर्वी भारतासहित जवळपास १०० देशात "वन्नाक्राय " या "रॅन्समवेअर" व्हायरस ने अक्षरशः धुमाकूळ घातला होता .

Now the fires of "fireball" | आता "फायरबॉल"चा धुमाकूळ

आता "फायरबॉल"चा धुमाकूळ

googlenewsNext
style="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत
औरंगाबाद, दि. 3 - नुकतेच काही दिवसापूर्वी भारतासहित जवळपास १०० देशात "वन्नाक्राय " या "रॅन्समवेअर" व्हायरस ने अक्षरशः धुमाकूळ घातला होता. शंभराहून अधिक देश या हल्ल्याचे शिकार झाले होते. जगभरात जवळपास पंचाहत्तर हजार संगणकावर हा हल्ला झाला होता. या घटनेतून नेटीझंस सावरते ना सावरते तोच अजून एक दुसरा व्हायरसचा हल्ला झाल्याचे निदर्शनात आले आहे. या व्हायरसचे नाव फायरबॉल असून हा मॅलवेअर आहे. चेकपॉईंट या सिक्युरिटी फर्म ने सांगितले कि फायरबॉल हा चायनीज मॅलवेअर असून त्याने आतापर्यंत जगभरात जवळपास २५० मिलियन कॉम्प्युटर्स ला प्रभावित केले आहे. 
 
फायरबॉल काय करतो ?
फायरबॉल हा मॅलवेअर तुमच्या वेब ब्राऊजर वर हल्ला करतो आणि तुमच्या ब्राऊजरचा ताबाच घेऊन टाकतो . त्यानंतर हा मॅलवेअर तुमच्या कॉम्पुटर वर काही कोड अर्थात छोटा प्रोग्राम इन्स्टॉल करून तुमच्या सर्व ब्राउजिंग वर नजर ठेवतो. तसेच या छोट्या प्रोग्राम च्या मदतीने तुमचा डेटा चोरून आपल्या मालकाकडे अर्थात हॅकर कडे पाठवितो . तसेच तुमचे जे डिफाल्ट सर्च इंजिन आहे त्याजागी फेक सर्च इंजिन कार्यरत करतो त्याचप्रमाणे तुमचे होम पेज च्या जागी फेक होम पेज कार्यरत करतो. या फेक सर्च इंजिन आणि फेक होम पेज च्या माध्यमातून हा तुमच्यावर जाहिरातीचा भडीमार करून आपल्या मालकाला अर्थात हॅकर ला पैसे कमावून देतो. 
 
काय काळजी घ्यावी ?
१. कुठल्याही साईटवरून काही फ्री सॉफ्टवेअर किंवा अन्य काहीही फ्री डाउनलोड करू नका . 
या मोफत मिळणाऱ्या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून हा मॅलवेअर तुमच्या कॉम्पुटर मध्ये प्रवेश 
करतो. 
२.इंटरनेट वापरताना नेहमी सुरक्षित वेबसाईटलाच भेट द्या. कुठल्याही मोफत भूलथापाना बळी पडुन चुकीच्या वेबसाईटला किंवा अनोळखी लिंकला क्लिक करू नका . 
३. संगणक किंवा लॅपटॉपची ऑपरेटींग सिस्टमही नेहमी अपडेट असावी कारण अपडेट मध्ये बऱ्याच वेळा काही प्रॉब्लेम्स वर सोलुशन उपलब्ध असते . 
४.तुमच्या संगणक किंवा लॅपटॉप मध्ये चांगला अ‍ॅण्टीव्हायरस असणे तसेच अ‍ॅण्टीव्हायरस नियमित 
अपडेट असणे आवश्यक आहे.
५.तुमचे सर्च इंजिन किंवा होम पेज बदलले असल्यास लगेच विंडोजच्या प्रोग्राम्स अँड फीचर्स 
मध्ये जाऊन ऍडवेअर काढून टाकावे . 
 

Web Title: Now the fires of "fireball"

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.