आता व्हॉटसअ‍ॅपवरून सुद्धा पाठवता येणार GIF इमेज !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2016 06:54 PM2016-06-08T18:54:28+5:302016-06-08T18:54:28+5:30

व्हॉटसअ‍ॅपने आता आपल्या वापरकर्त्यांसाठी जीफ (GIF) इमेज शेअर करण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. सध्या ही सुविधा फक्त आयफोन ऑपरेटिंग सिस्टिम असलेल्या स्मार्टफोनसाठी

Now the GIF image can be sent from WhatsApp! | आता व्हॉटसअ‍ॅपवरून सुद्धा पाठवता येणार GIF इमेज !

आता व्हॉटसअ‍ॅपवरून सुद्धा पाठवता येणार GIF इमेज !

Next

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ८ - व्हॉटसअ‍ॅपने आता आपल्या वापरकर्त्यांसाठी जीफ (GIF) इमेज शेअर करण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. सध्या ही सुविधा फक्त आयफोन ऑपरेटिंग सिस्टिम असलेल्या स्मार्टफोनसाठी सुरु करण्यात आली आहे. त्यानंतर लवकरच ऍड्रॉईड फोनसाठीही उपलब्ध करून देण्यात येणार आहे.


नेहमीच नवनवे अपडेटस युजर्संना देत नवनवीन सुविधा इन्स्टंट मेसेंजर अ‍ॅप म्हणून लोकप्रिय ठरलेल्या व्हॉटसअ‍ॅपने दिल्या आहेत. त्यामध्ये अलिकडेच पीडीएफ स्वरुपातील फाईल सपोर्ट, टेक्‍स फॉरमॅटिंग (बोल्ड, इटॅलिक)  अशा अनेक सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत.  आता पुन्हा जीफ (GIF) स्वरूपातील इमेज शेअर करण्याची सुविधा दिली आहे.

याशिवाय लवकरच व्हिडिओ कॉलिंगची सुविधाही येण्याची शक्‍यता व्यक्त करण्यात येत आहे. या सुविधेमुळे व्हॉटसअ‍ॅपच्या लोकप्रियतेत आणखी भर पडेल असे दिसते.

Web Title: Now the GIF image can be sent from WhatsApp!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.