आता हैदराबाद ही फक्त तेलंगणाची राजधानी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2024 07:03 AM2024-06-03T07:03:30+5:302024-06-03T07:03:50+5:30

दोन स्वतंत्र राज्ये झाल्याच्या दशकभरानंतरही या दोन राज्यांमध्ये अनेक मुद्द्यांवरून वाद कायम आहेत.

Now Hyderabad is only the capital of Telangana | आता हैदराबाद ही फक्त तेलंगणाची राजधानी

आता हैदराबाद ही फक्त तेलंगणाची राजधानी

हैदराबाद : देशातील सर्वात व्यग्र शहरांपैकी एक असलेले हैदराबाद आता दोन राज्यांची राजधानी राहिलेले नाही. आंध्र प्रदेश पुनर्रचना कायदा, २०१४ नुसार आंध्र आणि तेलंगणाची संयुक्त राजधानी असलेले हैदराबाद रविवारपासून फक्त तेलंगणाची राजधानी राहील. 

२ जून, २०१४ रोजी आंध्र प्रदेशच्या विभाजनानंतर तेलंगणा राज्याची स्थापना झाली. तेव्हापासून हैदराबाद जवळपास १० वर्षे आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या दोन्ही राज्यांची राजधानी राहिली. दोन स्वतंत्र राज्ये झाल्याच्या दशकभरानंतरही या दोन राज्यांमध्ये अनेक मुद्द्यांवरून वाद कायम आहेत.

Web Title: Now Hyderabad is only the capital of Telangana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.