आता चेक बाऊन्स झाल्यास होणार कठोर शिक्षा?

By admin | Published: December 25, 2016 02:31 PM2016-12-25T14:31:59+5:302016-12-25T15:18:46+5:30

नोटबंदीनंतर कॅशलेस व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकार लवकरच चेक बाऊन्स होण्याच्या कायद्यामध्ये मोठे बदल

Now if there is a check-in to severe punishment? | आता चेक बाऊन्स झाल्यास होणार कठोर शिक्षा?

आता चेक बाऊन्स झाल्यास होणार कठोर शिक्षा?

Next

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. 25 - नोटाबंदीनंतर कॅशलेस व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकार लवकरच चेक बाऊन्स होण्याच्या कायद्यामध्ये मोठे बदल करण्याची शक्यता आहे. केंद्र सरकार चेक बाऊन्सप्रकरणी कठोर कायदा अंमलात आणू शकते.

व्यापा-यांच्या एका संघटनेद्वारे सरकारला अशा प्रकारचा सल्ला देण्यात आला आहे. बजेट तयार होण्यापूर्वी अर्थ मंत्रालयाच्या मोठ्या अधिका-यांच्या भेटी ही संघटना घेत असल्याचं वृत्त टाईम्स ऑफ इंडियाने दिलं आहे.

चेक बाऊन्स होण्याच्या घटनांमुळे अनेक व्यापारी ग्राहकांकडून चेक घेण्यास काचकुच करतात. त्यामुळे चेक बाऊन्सप्रकरणी कठोर कायदा तयार करण्यात यावा अशी या व्यापा-यांची मागणी आहे.

चेक बाऊन्सप्रकरणी संबंधित व्यक्तीला एका महिन्याच्या आत तुरुंगात पाठवावे, अशी सूचना संघटनेने केल्याचं वृत्त आहे. संबंधिताला तुरुंगात पाठवण्याच्या शिक्षेसाठी सरकार तयार आहे की नाही हे नक्की नसले तरी या प्रकरणी कायदा कठोर करण्याबाबत सरकार विचार करू शकते.

Web Title: Now if there is a check-in to severe punishment?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.