आता मला रडायला येतेय...
By admin | Published: February 14, 2015 11:50 PM2015-02-14T23:50:34+5:302015-02-14T23:50:34+5:30
(वायफळ.....)
Next
(व ायफळ.....)आता मला रडायला येतेय...मुंबई :मंत्रालयासमोरील उत्तुंग प्रशासकीय भवन. सायंकाळी सव्वा चार वाजण्याची वेळ. पायर्या चढण्याची कोणाचीच तयारी नसल्याने तळमजल्यावर तिसर्या क्रमांकाच्या लिफ्टसाठी मोठी रांग लागली होती. लिफ्टचा दरवाजा व्यवस्थित बंद होत नसल्याने लिफ्ट सुरु होत नव्हती. अखेर लिफ्टमन लिफ्टमनने पाच मिनिटे प्रयत्न करुन दरवाजा बसविला आणि सुरु झाली.तिसर्या मजल्यावर लिफ्ट पोहचून काही क्षणात वरुन खाली कोसळली. कोणाला काहीच कळाले नाही. लिफ्ट खाली स्प्रिंगवर आदळल्याने बाहेर पडण्याचा सर्वांचा मार्ग बंद झाला होता. अखेर लिफ्टमधील नागरिकांनी लिफ्टमधील स्पीकरवरुन मदत मागितली. लिफ्ट दुरुस्तीचे काम सुरु असतानाच लिफ्टमधील अल्लड प्रशासन भवनातील अधिकार्याने था करण्यास सुरु केली. मला भिती वाटतेय...मला रडायला येतेय, असे हा अधिकारी मस्करीत बोलत होता. परंतू लिफ्ट मनने हा अधिकारी खरेच बोलतोय असे समजून लिफ्ट दुरुस्त करण्यासाठी प्रयत्न करत असलेल्या व्यक्तीला ओरडून सांगितले. लिफ्टमध्ये एक व्यक्ती घाबरला असून तो रडायला येतोय, असे बोलतोय. लवकरच काम करा, असे लिफ्टमनने सांगताच वरुन आवाज आला. कुणी महिला आहे काय? लगेच करतोय काम, थोडा वेळ थांबा घाबरु नका. काही वेळा लिफ्ट सुरु झाली आणि प्रत्येक जण आपआपल्या इच्छित स्थळी पोहचले. परंतू रडायला येतेय, असे बोलणारा अधिकारी उतरल्यानंतर सर्वच जण मोठ मोठ्याने हसायला लागले.