Wrestlers Protest: कुस्तीपटूंच्या समर्थनासाठी आता खाप पंचायत आखाड्यात, राकेश टीकेत म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2023 06:44 PM2023-06-01T18:44:27+5:302023-06-01T18:44:43+5:30
Wrestlers Protest: भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांच्यावर गंभीर आरोप करत त्यांच्यावर कारवाईसाठी कुस्तीपटूंनी आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनाला विविध क्षेत्रातून पाठिंबा मिळत आहे.
भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांच्यावर गंभीर आरोप करत त्यांच्यावर कारवाईसाठी कुस्तीपटूंनी आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनाला विविध क्षेत्रातून पाठिंबा मिळत आहे. आता या कुस्तीपटूंच्या समर्थनासाठी खाप पंचायत समोर आली आहे. तर शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी या प्रकरणी राष्ट्रपतींची भेट घेणार असल्याचे सांगितले. राकेश टिकेत यांनी यापुढील बैठक ही कुरुक्षेत्र येथे होणार असल्याचे सांगितले. आम्ही मुलींसाठी काहीही करू, पाच दिवसांची वेळ दिली आहे. त्यांनी बैठक घ्यावी, आम्हीही बैठक घेऊ, हा जो महिलांचा अपमान झाला आहे, तो देशाचा अपमान आहे, तिरंग्याचा अपमान आहे.
राकेश टिकेत यांनी पुढे सांगितले की, लवकरच खाप प्रतिनिधी हे राष्ट्रपतींची भेट घेतील. या संबंधात बैठक होईल. आम्ही आमच्या मुलींसाठी काहीही करू. त्यांनी आधी धर्मांच्या आधारावर फूट पाडली. लालूंच्या कुटुंबात फूट पाडली. अखिलेश यांच्या कुटुंबात फूट पाडली. ते म्हणतात ही लोकं एका जातीची आहेत. मात्र कुस्तीपटू जेव्हा परदेशात जातात, तेव्हा ते देशाचा झेंडा घेऊन जातात. त्यांना न्याय मिळाला नाहीतर आम्ही काहीही करण्यास तयार आहोत.