आता भारताकडे दुर्लक्ष करता येणार नाही - पंतप्रधान मोदी
By admin | Published: May 26, 2016 12:27 PM2016-05-26T12:27:57+5:302016-05-26T12:43:35+5:30
आपल्या सरकारने मागच्या दोन वर्षात मोठया प्रमाणावर सुधारणा केल्या असून, जागतिक स्तरावर भारताने दखल घेण्याजोगी कामगिरी केली आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २६ - माझ्या सरकारने मागच्या दोन वर्षात मोठया प्रमाणावर सुधारणा केल्या असून, जागतिक स्तरावर भारताने दखल घेण्याजोगी कामगिरी केली आहे असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. सरकारला दोनवर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने मोदी यांनी वॉल स्ट्रीट जर्नल या अमेरिकन वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत हा दावा केला.
आपण देशाची सूत्रे स्वीकारल्यापासून जागतिक राजकारणात भारत महत्वाची भूमिका बजावत असून, अमेरिकेबरोबरचे संबंध अधिक दृढ झाले आहेत असे मोदींनी म्हटले आहे. विकासाला चालना देण्यासाठी आपण मार्ग तयार केला असून आता राज्यांनी मदत करण्याची आवश्यकता आहे असे मोदी म्हणाले.
आपण अनेक सुधारणा केल्या असून, आपल्यासमोर अजून अनेक मोठी आव्हाने आहेत असे मोदी म्हणाले. माझ्या सरकारने भ्रष्टाचाराला रोखण्याबरोबर परकीय गुंतवणूकीला चालना दिली.
ग्रामीण भागात पायाभूत सोयी-सुविधांवर भर दिला आणि व्यवसाय सुलभतेसाठी अनेक निर्णय घेतले असे मोदींनी सांगितले. महत्वकांक्षी जीएसटी विधेयक यावर्षी मंजूर होईल अशी मोदींना अपेक्षा आहे.