आता व्हॉट्सअॅपवरून मोबाईल-लँडलाइनवर फोन शक्य

By admin | Published: March 29, 2016 09:08 AM2016-03-29T09:08:28+5:302016-03-29T09:09:15+5:30

व्हॉट्सअॅप, स्काईप, व्हायबरसारख्या अॅप्सवरून मोबाईल वा लँडलाइनवर फोन करणे थोड्याच दिवसात शक्य होणार.

Now it is possible to call phones from Whatsapp on mobile-landline | आता व्हॉट्सअॅपवरून मोबाईल-लँडलाइनवर फोन शक्य

आता व्हॉट्सअॅपवरून मोबाईल-लँडलाइनवर फोन शक्य

Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २९ - आपल्या लोकांशी कनेक्टेड राहण्यासाठी आजकाल लोकांकडून सोशल मीडियाचा जास्तीत जास्त वापर केला जातो. फेसबूक, ट्विटर, व्हॉट्सअॅप ही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स दिवसेंदिवस अधिक लोकप्रिय होत चालली असून फोनद्वारे सहज अॅक्सेस करता येणा-या व्हॉट्सअॅपला तर तरूणांची खूप पसंती आहे. आता याच व्हॉट्सअॅपवरून तुम्हाला मोबाईल वा लँडलाइनवर डायरेक्ट थेट फोन करणं शक्य होणार आहे. 
इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर्स आणि टेलिकॉम ऑपरेटर्सदरम्यानच्या इंटर-कनेक्ट कराराला सरकारच्या इंटर-मिनिस्ट्रीअल पॅनलतर्फे हिरवा कंदील दाखवण्यात आला आहे. त्यामुळे आता  व्‍हॉट्सअॅप, स्काईप, व्हायबरवरूनही कॉल करण्याची ही सुविधा लवकरच उपलब्ध होणार आहे. 
या अॅप्सवरून मोबाईल वा लँडलाइन नंबरवर करण्याचे हे फीचर उपलब्ध झाल्यास व्हॉईस कॉलचे चार्जेस कमी होण्याची शक्यता आहे.  
 

Web Title: Now it is possible to call phones from Whatsapp on mobile-landline

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.