आता सौरऊर्जेवर चालणार खादीचा चरखा

By admin | Published: October 29, 2015 12:37 AM2015-10-29T00:37:15+5:302015-10-29T00:37:15+5:30

सौरऊर्जेवर खादीचा चरखा चालविणारे पहिले राज्य बनण्याचा मान बहुदा गुजरात पटकावणार आहे. हा प्रयोग महाराष्ट्रातही व्हायला हवा,

Now the khadi charka will run on solar energy | आता सौरऊर्जेवर चालणार खादीचा चरखा

आता सौरऊर्जेवर चालणार खादीचा चरखा

Next

दीपक भट, अहमदाबाद
सौरऊर्जेवर खादीचा चरखा चालविणारे पहिले राज्य बनण्याचा मान बहुदा गुजरात पटकावणार आहे. हा प्रयोग महाराष्ट्रातही व्हायला हवा, अशी सूचना लोकमत वृत्तपत्र समूहाच्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन आणि खासदार विजय दर्डा यांनी केली आहे.
सौरऊर्जेचा वापर चरखा चालविण्यासाठी केला जाणार असल्याची माहिती गुजरातमध्ये प्रवास करताना मिळाली. हा खरोखरच अनुकरणीय पुढाकार आहे. त्यामुळे केवळ खादीचे उत्पादनच वाढणार नाही तर विणकरांना कामाचा
उचित मोबदलाही मिळेल, त्याचवेळी गांधीजींचे ग्रामीण विकासाचे
स्वप्नही साकार होईल, असे ते
म्हणाले.
खादी आणि ग्रामोद्योग आयोगाने (केव्हीआयसी) तसेच खादीला प्रोत्साहन देणाऱ्या अन्य संस्थांनीही अधिक टकळी (स्पिंडल्स) असणारा चरखा विकसित केला आहे, ज्याला सौर ऊर्जेवर चालविले जाऊ शकते. सौरऊर्जेवर खादी चरखा यशस्वीरीत्या चालवणारे गुजरात हे बहुदा पहिले राज्य बनणार आहे. त्याबाबत खादी प्रयोग समिती अहमदाबाद, उद्योग भारती ट्रस्ट गोंडल, सूरत इंजिनियरिंग विकास असोसिएशन तसेच इंडो-जर्मन टूल रुमकडून चाचण्या घेतल्या जात आहेत. केव्हीआयसीच्या सूत्रानुसार या चाचण्यांच्या निष्पत्तीसंबंधी अहवाल पुढील महिन्यात सरकारला सादर केला जाणार आहे.
खा. दर्डा म्हणाले की, केव्हीआयसी तसेच अमरावतीस्थित अशासकीय संघटना गांधीग्राम ऊर्जा विकास संस्थेने वर्धेच्या महात्मा गांधी ग्रामीण औद्योगिकीकरण संस्थेसोबत मिळून खादी चरख्याच्या कताई चाकाचे (स्पीनिंग व्हिल) डिझाईन तयार केले आहे. सद्यस्थितीत सूतकताई कामगारांमध्ये बहुतांश महिला कामगारांचा समावेश आहे. सरकार त्यांना योग्य मोबदला देऊ इच्छिते. सौर खादी चरखा आणण्याचा मुख्य हेतू महिला सूतकताई कामगारांना वाढीव मोबदला देणे हा आहे.
खादी संस्थांकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार, संबंधित संस्थांनी दहा लाख सूतकताई कामगारांना रोजगार मिळवून दिला आहे. मात्र यातून होणारी त्यांची कमाई अतिशय तुटपुंजी आहे. एक सूतकताई कामगार चरख्यावर हातांनी आठ तास सूत कातल्यानंतर केवळ अडीचशे रुपये कमावतो. सौरऊर्जेवर आधारित खादी चरख्याद्वारे चारपट अधिक सूतकताई होऊ शकते. पारंपरिक चरख्यात खादीचे ३-८ स्पिंडल्स होतात. यातून आठ तासांत सूताचे २५ पीळ तयार होतात. याउलट सौर ऊर्जेवर चालणाऱ्या चरख्यावर ३६ स्पिंडल्स असतात. याद्वारे आठच तासांत १०० पीळ तयार केले जाऊ शकतात.
उद्योग भारती ट्रस्ट १०-२४ स्पिंडल्स असलेल्या अशा १५ चरख्यांचा प्रायोगिक तत्त्वावर वापर सुरू करीत आहे. या चरख्यांची किंमत ३५ ते ४० हजार रुपयांपर्यंत आहे. गोंडलमध्ये या चरख्यांचे मूल्यमापन होणार आहे. या मूल्यमापनानंतर
सौर चरख्याच्या डिझाईनमध्ये आवश्यक ते बदलही केले जाऊ शकतात.

Web Title: Now the khadi charka will run on solar energy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.