आता दारुवरही सबसिडी हवी का - सुप्रीम कोर्ट

By admin | Published: August 26, 2015 08:51 PM2015-08-26T20:51:14+5:302015-08-26T20:51:14+5:30

आता दारुवरही सबसिडी हवी का असा सवाल उपस्थित करत सुप्रीम कोर्टाने दारुविक्रीला क्रेडिट कार्ड व आधार कार्डशी संलग्न करण्याची मागणी फेटाळून लावली आहे.

Now the liquor needs subsidy - Supreme Court | आता दारुवरही सबसिडी हवी का - सुप्रीम कोर्ट

आता दारुवरही सबसिडी हवी का - सुप्रीम कोर्ट

Next

ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. २६ - आता दारुवरही सबसिडी हवी का असा सवाल उपस्थित करत सुप्रीम कोर्टाने दारुविक्रीला क्रेडिट कार्ड व आधार कार्डशी संलग्न करण्याची मागणी फेटाळून लावली आहे.
केरळमधील बार व हॉटेल असोसिएशनच्या वतीने सुप्रीम कोर्टात दारुविक्री संदर्भात एक याचिका दाखल झाली होती. दारुविक्रीला क्रेडिट कार्ड व आधार कार्डशी संलग्न करावे अशी मागणी या याचिकेत करण्यात आली होती. या याचिकेवर बुधवारी सुनावणी झाली असता न्या. विक्रमजीत व न्या. शिवकिर्ती यांच्या खंडपीठाने आता दारुवरही सबसिडी हवी का असा सवाल याचिकाकर्त्यांना उपस्थित केला. मद्याच्या दुकानात एका व्यक्तीला दारु विक्री व किती दारु द्यावी यासंदर्भात नियमावली करण्याची गरज  असल्याचे खंडपीठाने म्हटले आहे. 

Web Title: Now the liquor needs subsidy - Supreme Court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.