आता एसी २४ अंशांवर होणार ‘लॉक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2018 05:41 AM2018-06-24T05:41:32+5:302018-06-24T05:41:38+5:30

‘एसी’ चालू केला की त्याचे तापमान आपोआप २४ अंश सेल्सिअसवरच राहील अशी व्यवस्था उत्पादकांना त्या यंत्रातच करायला सांगण्याचा सरकारचा विचार आहे.

Now the 'lock' will be done at AC 24 degrees | आता एसी २४ अंशांवर होणार ‘लॉक’

आता एसी २४ अंशांवर होणार ‘लॉक’

Next

नवी दिल्ली : ‘एसी’ चालू केला की त्याचे तापमान आपोआप २४ अंश सेल्सिअसवरच राहील अशी व्यवस्था (डिफॉल्ट टेम्परेचर) उत्पादकांना त्या यंत्रातच करायला सांगण्याचा सरकारचा विचार आहे. हे अमलात आल्यास विजेचा वापर कमी होऊन कोट्यवधींची बचत होईल. केंद्रीय ऊर्जामंत्री आर.के. सिंग म्हणाले की, ‘एसी’ यंत्रांमध्ये अशा प्रकारे ‘डिफॉल्ट सेटिंग’ केल्याने ग्राहकांना फक्त पैशाच्या स्वरूपात नव्हे तर तब्येतीच्या दृष्टीनेही फायदा होईल. भारतात दिवसा २४ अंश सेल्सिअस हे आदर्श व आल्हाददायक तापमान आहे. यापेक्षा कमी तापमानावर ‘एसी’ चालवायचा आणि मग थंड वाटते म्हणून उबदार कपडे घालून वावरायचे हा ऊर्जेचा अपव्यय आहे. येत्या काही महिन्यांत हा निर्णय लागू करता येईल, असे मंत्रालयास वाटते.

किती होऊ शकेल बचत?
देशात फक्त सहा टक्के घरांमध्ये ‘एसी’ आहेत.
सर्वांनी हा नियम पाळला तर दररोज २० अब्ज युनिट विजेची बचत होईल.
देशभरात बसविलेल्या ‘एसीं’ची क्षमता ८० दशलक्ष टन हवेच्या वातानुकूलनाची आहे.
सन २०३० पर्यंत ही क्षमता २५० दशलक्ष वाढण्याची अपेक्षा आहे.
या सर्वांचे ‘डिफॉल्ट सेटिंग’ केले तर ४० दशलक्ष युनिट विजेची रोज बचत होऊ शकेल.
(‘ब्युरो आॅफ एनर्जी एफिशियन्सी’ने केलेल्या अभ्यासानुसार)

Web Title: Now the 'lock' will be done at AC 24 degrees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.