आता रेल्वे स्थानकांच्या टेरेसवर होणार मॉल अन् बरंच काही, मोदी सरकारचा जबरदस्त प्लान!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2023 09:15 AM2023-02-10T09:15:46+5:302023-02-10T09:16:56+5:30

देशातील कोणत्याही शहराच्या रेल्वे स्थानकावर प्रवाशांना चांगल्या सुविधा मिळाल्या तर प्रवास करणे अधिक सोपे होते.

now mall like fun will be available on the roof of railway stations | आता रेल्वे स्थानकांच्या टेरेसवर होणार मॉल अन् बरंच काही, मोदी सरकारचा जबरदस्त प्लान!

आता रेल्वे स्थानकांच्या टेरेसवर होणार मॉल अन् बरंच काही, मोदी सरकारचा जबरदस्त प्लान!

googlenewsNext

देशातील कोणत्याही शहराच्या रेल्वे स्थानकावर प्रवाशांना चांगल्या सुविधा मिळाल्या तर प्रवास करणे अधिक सोपे होते. यावेळी मोदी सरकारचे मुख्य लक्ष भारतीय रेल्वेवर आहे. आगामी काळात देशातील रेल्वे स्थानके लोक पाहत राहतील अशा पद्धतीनं विकसित केली जाणार आहेत. रेल्वे स्थानकांच्या टेरेसवर लोकांना मॉलसारखा अनुभव मिळेल, अशी कल्पना पंतप्रधानांनी दिल्याचे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले. येथे प्रवाशांना सर्व प्रकारच्या हायटेक सुविधा मिळतील.

गेल्या महिन्यात झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे. आता रेल्वे स्थानकांचे स्वरूप बदलणार आहे. रेल्वे स्थानकांचा विमानतळाप्रमाणे विकास केला जाईल. विमानतळाप्रमाणेच स्थानकात प्रवेश आणि बाहेर जाण्याचे वेगवेगळे मार्ग तर असतीलच, शिवाय स्थानकाच्या बाहेरील भागातील ट्राफीकपासूनही लोकांची सुटका होईल. त्याचवेळी २०२६ पर्यंत देशात बुलेट ट्रेन सुरू होण्याची अपेक्षा आहे.

शहराच्या मध्यभागी आकर्षक आणि नागरी सुविधांसाठीची जागा म्हणून पंतप्रधानांनी रूफ प्लाझाची संकल्पना कशी मांडली हे रेल्वेमंत्र्यांनी स्पष्ट केलं. आपल्याला ५० वर्षे पुढचा विचार करायचा आहे, असं पंतप्रधानांनी सांगितल्याचं वैष्णव म्हणाले. पंतप्रधान मोदींनी सुरुवातीला आम्हाला ५० स्थानकांचे लक्ष्य दिले होते. मी त्यांच्यासमोर प्रेझेंटेशन केलं आणि २ तासांहून अधिक काळ प्रेझंटेशन देऊनही पंतप्रधान मोदी समाधानी झाले नाहीत. त्यांनी संध्याकाळी नंतर फोन केला की डिझाइन सध्यासाठी योग्य आहे, परंतु आपल्याला पुढच्या ५० वर्षांसाठीचा विचार करावा लागेल असं म्हटल्याचं अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं.

रेल्वेची क्षमता वेगानं वाढणार
रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की, देशात वेगाने होत असलेल्या या जागतिक दर्जाच्या बदलांमागे पंतप्रधान मोदींची विचारसरणी आहे. पंतप्रधान कोणतेही काम भविष्य डोळ्यासमोर ठेवून करतात. भविष्यात कोणत्या प्रकारच्या गरजा असतील, त्यानुसार विकासकामे केल्याने पंतप्रधानांची उत्तम विचारसरणी दिसून येते. पंतप्रधानांचे लक्ष रेल्वेवर असून आगामी काळात रेल्वेची क्षमता झपाट्याने वाढणार आहे. वंदे भारत ट्रेनबद्दल ते म्हणाले की, जगातील सर्वोत्तम ट्रेनपेक्षाही अनेक पॅरामीटर्समध्ये ती चांगली आहे.

रेल्वे स्थानकांवर रूफ प्लाझा
रेल्वे मंत्र्यांचे म्हणणे आहे की, पंतप्रधानांनी रेल्वे स्थानके अगदी सहजतेने आधुनिकतेने जोडण्याची सूचना केली आहे. रेल्वे स्थानकांवर रुफ टॉप प्लाझा असावं अशी पंतप्रधानांचं व्हिजन आहे. या ठिकाणी वेटिंग एरिया, स्थानिक वस्तू विकण्याची सोय, फूड कोर्ट, लहान मुलांना खेळण्यासाठी जागा असावी, असा त्यांचा मानस आहे. पंतप्रधान मोदींनी रेल्वे स्थानकांबाबत एक मोठी सूचना दिली आहे. पंतप्रधान म्हणाले की रेल्वे स्थानकं सामान्यतः शहराच्या दोन भागांमध्ये बांधली जातात. जे एकमेकांशी कनेक्ट होऊ शकत नाहीत. अशा स्थितीत शहराचे दोन्ही भाग जोडले जातील अशा पद्धतीने स्थानकांची रचना करावी. 

Web Title: now mall like fun will be available on the roof of railway stations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.