आता चौबे शाळा ते बेंडाळे चौक रस्त्यावर कारवाई नगररचना विभागातर्फे नकाशा तयार : पक्क्या अतिक्रमणांची मोजणी सुरू

By admin | Published: March 11, 2016 10:26 PM2016-03-11T22:26:17+5:302016-03-11T22:26:17+5:30

जळगाव : शिवाजीरोडवरील १०० वर्ष जुने पक्के अतिक्रमण तसेच हॉकर्स हटविल्यानंतर आता मनपा प्रशासनाने चौबे शाळा ते सुभाष चौक व तेथून बेंडाळे चौकापर्यंतच्या रस्त्यावरील अतिक्रमणांवर कारवाईची तयारी सुरू केली आहे. त्यासाठी नगररचना विभागाने नकाशा तयार करून प्रत्यक्ष जागेवर जाऊन अतिक्रमणांची मोजणी करण्यास प्रारंभ केला आहे.

Now the Map of the Town Planning Department will take action against Chaube School from Bendale Chowk Road: the counting of encroachments will be started | आता चौबे शाळा ते बेंडाळे चौक रस्त्यावर कारवाई नगररचना विभागातर्फे नकाशा तयार : पक्क्या अतिक्रमणांची मोजणी सुरू

आता चौबे शाळा ते बेंडाळे चौक रस्त्यावर कारवाई नगररचना विभागातर्फे नकाशा तयार : पक्क्या अतिक्रमणांची मोजणी सुरू

Next
गाव : शिवाजीरोडवरील १०० वर्ष जुने पक्के अतिक्रमण तसेच हॉकर्स हटविल्यानंतर आता मनपा प्रशासनाने चौबे शाळा ते सुभाष चौक व तेथून बेंडाळे चौकापर्यंतच्या रस्त्यावरील अतिक्रमणांवर कारवाईची तयारी सुरू केली आहे. त्यासाठी नगररचना विभागाने नकाशा तयार करून प्रत्यक्ष जागेवर जाऊन अतिक्रमणांची मोजणी करण्यास प्रारंभ केला आहे.
सवार्ेच्च न्यायालयाने नेमलेल्या रस्ता सुरक्षा समितीच्या निर्देशानुसार शहरातील प्रमुख रस्ते वाहतुकीसाठी मोकळे करण्याची मोहीम मनपाने हाती घेतली आहे. त्याअंतर्गत शिवाजीरोडवरील अतिक्रमणे तसेच हॉकर्सच हटविण्यात आले. या रस्त्यावरील कारवाईत दुकानदारांनी मनपाला सहकार्य करीत स्वत:हून अतिक्रमीत शेड व ओटे, पायर्‍या काढून घेतले. तर हॉकर्सनेही सहकार्य केल्याने त्यांचे न्यू बी.जे. मार्केटच्या परिसरात स्थलांतर करण्यात आले आहे. त्यानंतर मनपा प्रशासनाने आता चौबे शाळेपासून सुभाष चौक ते बेंडाळे चौक या रस्त्यावरील अतिक्रमणांचे मोजमाप सुरू केले आहे. या रस्त्यावरील पक्की अतिक्रमणे या मोजमापात चिन्हांकीत करून त्यावर अतिक्रमण विभागातर्फे कारवाई केली जाणार आहे. तसेच हॉकर्सचे गोलाणी मार्केटमधील ओट्यांवर स्थलांतर केले जाणार आहे. शिवाजीरोडवरील दुकानदार व हॉकर्सने मनपाला कारवाईत सहकार्य करीत चांगला पायंडा पाडून दिलेला असल्याने या रस्त्यावर कारवाईतही अडथळा येणार नसल्याची अपेक्षा मनपा प्रशासनाकडून व्यक्त होत आहे.

Web Title: Now the Map of the Town Planning Department will take action against Chaube School from Bendale Chowk Road: the counting of encroachments will be started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.