आता बाजार समिती करणार अंडी, कोंबडी यांचे नियमन
By Admin | Published: April 13, 2015 11:53 PM2015-04-13T23:53:09+5:302015-04-13T23:53:09+5:30
चिकन व्यापार्यांचा विरोध : आंदोलन करण्याच्या पावित्र्यात
च कन व्यापार्यांचा विरोध : आंदोलन करण्याच्या पावित्र्यातपुणे : पुण्याच्या बाजार क्षेत्रामध्ये प्रादेशिक कृषी उत्पन्न बाजार समितीने आता अंडी आणि कोंबडी यांचे नियमन सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाला चिकन व्यापार्यांनी विरोध दर्शविला असून त्याविरोधात लवकरच बैठक होणार आहे. प्रादेशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने पुणे, पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील गावे, खडकी आणि देहुरोड छावणी मंडळाच्या हद्दीतील क्षेत्राचा समावेश करण्यात आला आहे. पणनच्या उपविधीनुसार कोंबड्या व अंडी या नियमित शेतमालावर प्रत्येक शंभर रुपयाचे खरेदी विक्रीवर एक रुपया बाजार फी आकारण्याचे व वसुल करण्याचे अधिकार बाजार समितीला देण्यात आले आहेत. आत्तापयंर्त अनेक व्यक्ती, संस्था, भागीदारी संस्था हा व्यवसाय करीत असून बेकायदेशीर रित्या विनापरवाना खरेदी-विक्री करीत आहेत. त्यावर असणारा एक टक्का सेस बाजार समितीकडे भरत नसल्याने समितीचे आर्थिक नुकसान होत आहे. त्यामुळे याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे. वास्तविक हा प्रस्ताव आणि त्यावर दीड ते दोन वषापुर्वीच याबाबतचा निर्णय घेण्यात आला होता.कोटबाजार समितीने घेतलेला निर्णय अन्यायकारक आहे. आमचा या निर्णयाला ठाम विरोध आहे. याबाबत चर्चा करण्यासाठी लवकरच आम्ही बैठक घेणार आहोत. त्यात समितीच्या निर्णयाचा निषेध करण्यात येईल. बाजार समितीच्या या अनाकलनीय निर्णयाविरोधात आंदोलन करण्याचा आम्ही गंभीरपणे विचार करीत आहोत. - रुपेश परदेशी,चिकनचे व्यापारी