आता घरबसल्या आधार कार्डशी लिंक करता येणार मोबाईल नंबर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2017 06:49 PM2017-10-25T18:49:26+5:302017-10-25T18:50:17+5:30
मोबाइल क्रमांक आधार कार्डशी जोडण्याची प्रक्रिया सोपी करण्यासाठी सरकारकडून पावले उचलण्यात येत आहेत. मोबाइल ग्राहक घरबसल्या आपला मोबाइल क्रमांक आधारकार्डशी लिंक करू शकतील.
नवी दिल्ली - मोबाइल क्रमांक आधार कार्डशी जोडण्याची प्रक्रिया सोपी करण्यासाठी सरकारकडून पावले उचलण्यात येत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार मोबाइल ग्राहक घरबसल्या आपला मोबाइल क्रमांक आधारकार्डशी लिंक करू शकतील. मोबाइल क्रमांकासोबत आधार कार्ड लिंक करण्याची प्रक्रिया सोपी करण्यासाठी सरकारकडून वन टाइम पासवर्ड आणि घरातच रि व्हेरिफिकेशनची सुविदा देऊ शकते.
सध्या मोबाइल क्रमांक आधार कार्डशी लिंक करण्यासाठी एनरॉलमेंट सेंटरमध्ये जावे लागते. मात्र घरबसल्या मोबाइल क्रमांक आधार कार्डशी लिंक करण्याची सुविधा मिळाल्यास ही प्रक्रिया सुलभ होणार आहे. मोबाइल क्रमांकाशी आधारक्रमांक जोडण्याची प्रक्रिया सोपी करण्यासाठी रिव्हेरिफिकेशनची सुविधा मोबाइल ग्राहकाच्या घरीच उपलब्ध करुन देण्याचे निर्देश देण्यात येतील. ज्येष्ठ नागरिक, आजारी व्यक्त आणि दिव्यांगांना या सुविधेचा फायदा मिळेल.
मोबाइल कंपन्यांना ऑनलाइन व्हेरिफिकेशनसाठी योग्य ते तंत्र उपलब्ध करण्यास सांगण्यात आले आहे नवीन मोबाइल क्रमांकासाठी आधार कार्ड आधीच अनिवार्य करण्यात आले आहे. मात्र जुन्या ग्राहकांनाही आपला मोबाइल क्रमांका आधार कार्डशी लिंक करण्यासा सांगण्यात आले आहे.
आधारमध्ये अशाप्रकारे व्हेरिफाय करा मोबाइल नंबर आणि ईमेल आयडी
मोबाइल ग्राहकांसाठी आधार ओटीपी आधारित व्हेरिफिकेशनची सुविधा सुरू करण्यात आली आहे. टेलिकॉम ऑपरेटर्सना मोबाइल ग्राहकांसाठई ओटीपी आधारित रिव्हेरिफिकेशन प्रक्रिया सुरू करण्यास सांगण्यात आले आहे. तसेच या सुविधेचा लाभ घेण्यासाठई ग्राहकांना एसएमएस, आयव्हीआरएस किंवा त्यांच्या मोबाइल अॅपचा वापर करण्यासा सांगण्यात आले आहे.
जर तुमचा मोबाइल क्रमांक आधारच्या डाटाबेसमध्ये नोंदणीकृत असेल तर ओटीपी पद्धचीचा वापर त्या क्रमांकाच्या रिव्हेरिफिकेशनशिवाय संबंधिक ग्राहकाच्या अन्य मोबाइल क्रमांकाच्या व्हेरिफिकेशनसाठीसुद्धा करता येईल. सूत्रांनी सांगितले की देशातील सुमारे 50 कोटी मोबाइल क्रमांक याआधीच आधार डेटाबेसमध्ये रजिस्टर्ड झाले आहेत. या सर्वांच्या पुन:सत्यापनासाठी ओटीपीचा वापर करू शकता.