Monkeypox : आता मंकीपॉक्सची होणार चाचणी; RT-PCR किट लाँच, 50 मिनिटांत मिळेल रिपोर्ट!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2022 08:30 PM2022-07-26T20:30:59+5:302022-07-26T20:31:58+5:30

Monkeypox : कंपनीने दावा केला आहे की, पीओएक्स-क्यू मल्टिप्लेक्स्ड (POX-Q Multiplexed) असलेली आरटी-पीसीआर किट हाय फ्रिक्वेंसी रेटसह 50 मिनिटांपेक्षा कमी वेळेत निकाल देते.

now monkeypox will be tested rtpcr kit launched results will be available in 50 minutes | Monkeypox : आता मंकीपॉक्सची होणार चाचणी; RT-PCR किट लाँच, 50 मिनिटांत मिळेल रिपोर्ट!

Monkeypox : आता मंकीपॉक्सची होणार चाचणी; RT-PCR किट लाँच, 50 मिनिटांत मिळेल रिपोर्ट!

googlenewsNext

नवी दिल्ली : मंकीपॉक्स  (Monkeypox) व्हायरससाठी रिअल-टाइम पीसीआर-आधारित किट विकसित केल्याची घोषणा डायग्नोस्टिक कंपनी Genes2Me ने मंगळवारी केली आहे. कंपनीने दावा केला आहे की, पीओएक्स-क्यू मल्टिप्लेक्स्ड (POX-Q Multiplexed) असलेली आरटी-पीसीआर किट हाय फ्रिक्वेंसी रेटसह 50 मिनिटांपेक्षा कमी वेळेत निकाल देते.

Genes2Me चे सीईओ आणि संस्थापक नीरज गुप्ता यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, 'ही अभूतपूर्व वेळ आरोग्य सुरक्षा तयारी आणि सज्जतेमध्ये क्लिनिकल चाचण्यांचे महत्त्व अधोरेखित करते. वेळेचे मूल्य ओळखून, आम्ही मंकीपॉक्ससाठी हा आरटी पीसीआर लाँच केला आहे, जो सर्वाधिक अचूकतेसह 50 मिनिटांपेक्षा कमी वेळेत निकाल देईल.'

कंपनीची सध्या आठवड्यातून 50 लाख चाचणी किट तयार करण्याची क्षमता आहे आणि अतिरिक्त मागणीसह ही संख्या दिवसाला 20 लाखांपर्यंत वाढविली जाऊ शकते, असेही नीरज गुप्ता यांनी म्हटले आहे. दरम्यान, आतापर्यंत 75 देशांमध्ये मंकीपॉक्सची 16,000 हून अधिक प्रकरणे नोंदवली गेली आहेत. भारतातही या व्हायरसचे चार रुग्ण आढळले आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) याला आंतरराष्ट्रीय चिंता म्हणून सार्वजनिक आरोग्य आणीबाणी घोषित केली आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने शिफारस केली आहे की, मंकीपॉक्सच्या प्रयोगशाळेच्या पुष्टीकरणासाठी नमुन्याचा प्रकार हा त्वचेच्या जखमेची सामग्री (स्किन लेसियन मॅटिरियल) आहे, ज्यामध्ये जखमेची पृष्ठभाग किंवा एक्स्युडेट, एकापेक्षा जास्त जखमांचे थर किंवा जखमेच्या कवचांचा समावेश आहे. त्यामुळे मंकीपॉक्स शोधण्यासाठी व्हीटीएम किंवा व्हायरल ट्रान्सपोर्ट माध्यममध्ये ठेवलेले कोरडे स्वॅब आणि स्वॅब दोन्हींचा उपयोग केला जाऊ शकतो. 

सामान्यत: उपलब्ध असलेल्या कोणत्याही आरटी-पीसीआर उपकरणांसाठी मानक आवृत्तीसोबत Genes2Me Rapi-Q HT Rapid RT-PCR  उपकरणावर पॉइंट-ऑफ-केअर फॉरमॅट दोन्हीमध्ये किट उपलब्ध आहे. कंपनीने सांगितले की, पॉइंट-ऑफ-केअर सोल्यूशनचा वापर रुग्णालये, विमानतळ, निदान प्रयोगशाळा, आरोग्य शिबिरांसह अनेक ठिकाणी स्क्रीनिंगसाठी केला जाऊ शकतो.

Web Title: now monkeypox will be tested rtpcr kit launched results will be available in 50 minutes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.