हवाई प्रवाशांना आता जादा भरपाई

By admin | Published: March 13, 2016 04:05 AM2016-03-13T04:05:11+5:302016-03-13T04:05:11+5:30

विमान अपघातात मृत्यू होणे, जखमी होणे, सामान हरवणे किंवा अक्षम्य उशीर यासाठी हवाई प्रवाशांना मिळणाऱ्या भरपाईमध्ये वाढ करण्यात आली आहे.

Now more compensation for air travelers | हवाई प्रवाशांना आता जादा भरपाई

हवाई प्रवाशांना आता जादा भरपाई

Next

नवी दिल्ली : विमान अपघातात मृत्यू होणे, जखमी होणे, सामान हरवणे किंवा अक्षम्य उशीर यासाठी हवाई प्रवाशांना मिळणाऱ्या भरपाईमध्ये वाढ करण्यात आली आहे. या संबंधीचे हवाई वाहतूक दुरुस्ती विधेयक संसदेत नुकतेच मंजूर करण्यात आले आहे.
हवाई अपघातात मृत्यू किंवा जखमी झाल्यास यापुढे १.०५ कोटी रुपयांपर्यंत भरपाई मिळू शकेल. सध्या ही भरपाई ९३ लाख होती. ही रक्कम स्पेशल ड्रॉइंग राईट्स (एसडीआर)द्वारे मोजण्यात येणार आहे.
एसडीआरचे चलनमूल्य अमेरिकन डॉलर, युरो, जापनीज येन आणि पाऊंड स्टर्लिंगच्या बाजार विनिमय दरावर अवलंबून असेल. एक एसडीआर म्हणजेच सुमारे ९३ रुपये होय.
यापुढे विमानाला उशीर झाल्यास ४.३६ लाखांपर्यंतची भरपाई मिळेल. सध्या ही भरपाई ३.८६ लाख रुपये देण्यात येत आहे. आंतरराष्ट्रीय नागरी हवाई वाहतूक संघटना (आयसीएओ) पाच वर्षांतून एकदा अशा भरपाईची मर्यादा वाढवते. (लोकमत न्यूज नेटवर्क)
> सामान गहाळ झाल्याच्या भरपाईतही वाढ
कार्गो कॅरेज नाहीसे होणे, नुकसान होणे किंवा अक्षम्य उशीर होण्याच्या स्थितीत मिळणारी भरपाईही वाढवण्यात आली आहे. बॅगेज नाहीसे होणे, नुकसान होणे किंवा अक्षम्य उशीर होण्याच्या स्थितीत देशांतर्गत एअरलाईन्सकडून १.०५ लाख रुपयांपर्यंत भरपाई मिळेल. सध्या ती ९३,००० रुपये मिळते. भारताने मे २००९मध्ये स्वीकारलेल्या धोरणानुसार ही भरपाई मिळेल.

Web Title: Now more compensation for air travelers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.