यापुढे ‘नीट’ परीक्षेचे सर्व भाषांमधील पेपर एकसारखेच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2017 12:57 AM2017-07-24T00:57:50+5:302017-07-24T00:57:50+5:30

देशभरातील वैद्यकीय प्रवेशांसाठी घेतल्या जाणाऱ्या ‘नॅशनल एलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट’ (नीट) या परीक्षेच्या प्रश्नपत्रिका पुढील वर्षापासून सर्व भाषांमध्ये एकसारख्याच

Now the paper in all the languages ​​of the 'fair' test is the same! | यापुढे ‘नीट’ परीक्षेचे सर्व भाषांमधील पेपर एकसारखेच!

यापुढे ‘नीट’ परीक्षेचे सर्व भाषांमधील पेपर एकसारखेच!

Next

कोलकाता : देशभरातील वैद्यकीय प्रवेशांसाठी घेतल्या जाणाऱ्या ‘नॅशनल एलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट’ (नीट) या परीक्षेच्या प्रश्नपत्रिका पुढील वर्षापासून सर्व भाषांमध्ये एकसारख्याच असतील व त्यात भाषेगणिक वेगवेगळे प्रश्न असणार नाहीत.
केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी पत्रकारांना सांगितले की, सन २०१८ पासून ‘नीट’ परीक्षेच्या इंग्रजीखेरीज इतर भाषांमधील प्रश्नपत्रिका वेगळ््या असणार नाहीत तर त्या मूळ इंग्रजी प्रश्नपत्रिकेचे फक्त साधे, सरळ भाषांतर असेल. त्यामुळे वेगवेगळ््या भाषेतील प्रश्नपत्रिकांमध्ये निरनिराळे प्रश्न असणार नाहीत.
यंदाच्या ‘नीट’ परीक्षेची प्रश्नपत्रिका इंग्रजी व हिंदीमध्ये एकसारखी होती. मात्र, इतर भाषांमधील प्रश्नपत्रिकांमध्ये त्याहून वेगळे आणि काही ठिकाणी अधिक कठीण प्रश्न होते. यावरून वाद झाला होता व मद्रास उच्च न्यायालयाने यावरून निकालास अंतिम स्थगिती दिली होती. नंतर सर्वोच्च न्यायालायने ही स्थगिती उठविली खरी, पण निकाल ठरल्या तारखेला लागू शकला नव्हता.
‘नीट’ परीक्षा देणाऱ्यांची संख्या कित्येक लाखांत आहे. शिवाय प्रश्नपत्रिकाही अनेक भाषांमधून काढाव्या लागतात. त्यामुळे मूळ प्रश्नपत्रिका इंग्रजीमध्ये तयार करून त्याचे इतर भारतीय भाषांमध्ये भाषांतर करायचे म्हटले तर त्यातून कदाचित प्रश्नपत्रिका परिक्षेआधीच फुटण्याची शक्यता असते. त्यामुळे निव्वळ भाषांतर न करता ढोबळ मानाने तेच प्रश्न कायम ठेवून भाषावार स्वतंत्र प्रश्नपत्रिका तयार केल्या गेल्या होत्या, असे समर्थन ही परीक्षा घेणाऱ्या केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) केले होते. जावडेकर
यांचे आताचे उत्तर पाहता मंडळाची ही सबब मंत्रालयाने हाणून पाडल्याचे दिसते.
वैद्यकीयच्या धर्तीवर ‘एक देश, एक प्रवेश परीक्षा’ या सूत्रानुसार अभियांत्रिकी प्रवेशांसाठीही देशपातळीवर एकच सामायिक प्रवेश परीक्षा घेण्याचा विचार नाही, असेही जावडेकर यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात स्पष्ट केले.ते म्हणाले की, वैद्यकीय प्रवेशंसाठीच्या ‘नीट’ परिक्षेचे
यंदा पहिलेच वर्ष होते. त्याचे निकालोत्तर फलित काय होते ते
पाहावे लागेल. त्यामुळे अभियांत्रिकीसाठीही अशी परीक्षा घेण्याचा विषय सध्या फक्त चर्चेच्या पातळीवर आहे. (वृत्तसंस्था)

५ वी, ८वीची होणार परीक्षा
इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत कोणाचीही परीक्षा घ्यायची नाही व कोणालाही त्याच इयत्तेत ठेवायचे नाही, या धोरणामुळे विद्यार्थ्यांचेच नुकसान होत असल्याचे दिसून आल्याने यात सुधारणा करण्यासाठी संसदेत लवकरच एक दुरुस्ती विधेयक मांडले जाईल, असेही जावडेकर यांनी सांगितले.

त्यानुसार, इयत्ता पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांची मार्चमध्ये परीक्षा घेतली जाईल. त्यात जे अनुत्तीर्ण होतील त्यांना मे महिन्यात पुन्हा एक परीक्षा घेऊन उत्तीर्ण होण्याची संधी दिली जाईल. मात्र, मेमधील परीक्षेतही उत्तीर्ण न होणाऱ्या विद्यार्थ्यांना त्याच इयत्तेत ठेवले जाईल. हा बदल स्वीकारणे राज्यांना ऐच्छिक असेल व २५ राज्यांनी त्यास संमती दिली आहे, असेही जावडेकर म्हणाले.

Web Title: Now the paper in all the languages ​​of the 'fair' test is the same!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.