आता पंतप्रधान मोदी घेणार सुखद निर्णय : सर्व्हे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2017 05:03 AM2017-08-14T05:03:45+5:302017-08-14T05:03:48+5:30
नोटाबंदी आणि जीएसटीसारख्या सुधारणा केल्यानंतर, मोदी सरकार आता लोकांसाठी दिलासा देणारे काही निर्णय घेणार आहे.
नवी दिल्ली : नोटाबंदी आणि जीएसटीसारख्या सुधारणा केल्यानंतर, मोदी सरकार आता लोकांसाठी दिलासा देणारे काही निर्णय घेणार आहे. याबाबत प्रसिद्ध झालेल्या एका अहवालात म्हटले आहे की, करात सूट आणि इतर महत्त्वपूर्ण निर्णय घेत, लोकांपर्यंत आपली कामगिरी पोहोचविण्याचा प्रयत्न सरकार करील.
बार्कलेज इंडियाचे मुख्य अर्थतज्ज्ञ सिद्धार्थ सन्याल यांनी म्हटले आहे की, २०१९ च्या निवडणुकांवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी पंतप्रधान नरेंद्र मोदी आतापर्यंत केलेल्या सुधारणा आणि पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांना बळ देण्याचे काम करतील. याशिवाय प्रशासकीय कामात लक्ष केंद्रित होईल. मायक्रोइकॉनॉमिक्सच्या आघाडीवर नव्या कायदेशीर सुधारणा केल्या जाणार नाहीत. २०१४ नंतर ४,३१३ कोटी रुपयांचा काळा पैसा उघड झाला आहे. भ्रष्टाचाराविरुद्ध मोहिमेतील या यशानंतर ते आता सरकारी योजनांचा लाभ सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करतील. आगामी १८ महिन्यांत सुधारणांचा वेग वाढविला, तर आगामी काळात त्यांचे यशापयश यावरच अवलंबून असेल.