आता रामलीलेतील रामसुद्धा मोदींचा मुखवटा घालून येईल
By admin | Published: January 16, 2017 04:10 PM2017-01-16T16:10:16+5:302017-01-16T16:54:26+5:30
काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आज पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडले.
Next
ऑनलाइन लोकमत
ऋषिकेश, दि. 16 - काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आज पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडले. मोदींना दिखावूपणाची फार आवड असून, आता तो दिवस दूर नाही जेव्हा रामलीलेमधील रामसुद्धा मोदींचा मुखवटा घालून येईल, अशा शब्दात राहुल यांनी मोदींवर टीकास्त्र सोडले.
ऋषिकेश येथे प्रचासभेला संबोधित करताना राहुल गांधी म्हणाले, "नोटाबंदीचा निर्णय घेऊन मोदींनी एका मिनिटात आरबीआयसारख्या मोठ्या संस्थेची हत्या केली . आतातर, ज्या व्यक्तीने तिरंग्यासाठी छातीवर गोळ्या झेलल्या, त्याच व्यक्तीचे छायाचित्र मोदींनी हटवले. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 52 वर्षे आरएसएसच्या मुख्यालयावर तिरंगा फडकत नव्हता, ते भगव्या झेंड्यालाच सलामी देत होते, त्यामुळे आता तो दिवस दूर नाही जेव्हा रामलीलेतील रामसुद्धा मोदींचा मुखवटा घालून येईल."
Ram Leela mein Ram Ji Modiji ka mask pehan ke aayenge: Rahul Gandhi in Rishikesh pic.twitter.com/dbvXeSRrgH
— ANI (@ANI_news) 16 January 2017
राहुल गांधींनी मोदींवरील टीकेची धार अधिक वाढवताना त्यांच्या उद्योगपतींसोबत असलेल्या सबंधांचाही पुनरुच्चार केला."चरखा हे गरिबाच्या कमाईचे साधन आहे, मोदी चरख्यासोबत फोटो घेतात आणि दिवसभर 50 उद्योगपतींसाठी काम करतात." असे ते म्हणाले. तसेच नोटाबंदीचा निर्णय एका मिनिटात घेऊन टाकला, तसा OROPचा निर्णयही झटपट घेऊन टाका, असे आव्हानही राहुल गांधी यांनी मोदींना दिले. यावेळी राहुल यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांची तुलना वाघाशी केली, तर भाजपच्या कार्यकर्त्यांची तुलना धमकावणाऱ्या गुंडांशी केली.
The way you took the decision of #Demonitization in a minute Modi Ji, you must also do the same for OROP: Rahul Gandhi in Rishikesh pic.twitter.com/XxtMawVG3r
— ANI (@ANI_news) 16 January 2017