आता भरणार सुटीतही शाळा
By admin | Published: April 10, 2015 11:29 PM2015-04-10T23:29:57+5:302015-04-10T23:29:57+5:30
शिक्षण विभागाचा स्तुत्य उपक्रम
Next
श क्षण विभागाचा स्तुत्य उपक्रमलोहा : शाळेला सुटी लागली म्हटल्यानंतर चिमुकल्या विद्यार्थ्यांना कमालीचा आनंद होतो़ वर्षभर पाटी, वही, पेन, पुस्तक, अभ्यास, शिकवणी या सर्वांपासून महिना-दीड महिन्यांच्या कालावधीकरिता सुट मिळते़ चिमुकले बाळगोपाळ मामाच्या गावाला जातात़ मात्र सुट्या लागल्यानंतर देखील जो विद्यार्थी गावीच राहतो़ त्यांच्यासाठी शिक्षण विभागाकडून सुटीतही शाळा भरविली जाणार आहे़महाराष्ट्र दिनापासून शाळेचा निकाल लागल्यानंतर खर्या अर्थाने अधिकृतरित्या शिक्षण विभागाकडून शाळांना सुट्या लागतात़ सुटी मिळाल्यास जो विद्यार्थी बाहेरगावी न जाता गावीच राहतो़ त्या विद्यार्थ्यांची अभ्यासाची सवय मोडू नये व सुट्यांचा सदुपयोग व्हावा या उदात्त हेतूने मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या आदेशान्वये गावातील शिक्षणप्रेमी, सामाजिक कार्यकर्ते व शैक्षणिक कार्याची आवड असणार्या स्वयंसेवकांकडून विना मोबदला केवळ समाजसेवी भावना असणार्या व्यक्तींकडून सुटी कालावधीत शाळा भरविण्यात येणार आहे़ या उपक्रमात प्रेरकांचा सहभाग राहणार आहे़ सुटी कालावधीत सुरू असणार्या शाळांमधून चिमुकल्या विद्यार्थ्यांना वाचनाची आवड कायम रहावी उयासाठी एक हजार रुपयांची बोधकथा, गोष्टी, महापुरुषांचे कार्य आदी पुस्तके तसेच बौद्धिम क्षमता वाढीस लागावी यासाठी बुद्धीबळ पट व खेळ प्रकारात कॅरम उपलब्ध करून दिले जाणार आहेत़ या माध्यमातून विद्यार्थ्यांची वाचन, बौद्धिक क्षमता वाढविणे व खिलाडू वृत्ती जोपासणे आदी मुळ उद्देश आहे़ तशा सूचना गटशिक्षणाधिकारी पी़एम़ कुलकर्णी यांनी संंबंधितांना दिल्या आहेत़ यावेळी सर्व शिक्षा अभियानाचे दिनेश तेलंग, गटसमन्वयक शिवराज सोनवळे, शिंदे, विषयतज्ज्ञ संजय अकोले आदींची उपस्थिती होती़