आता अगरबत्ती उत्पादनासाठीही आत्मनिर्भर मिशन!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2020 06:15 AM2020-08-03T06:15:21+5:302020-08-03T06:15:49+5:30
खादी ग्रामोद्योग आयोगाच्या योजनेस मंजुरी; रोजगाराच्या संधी, उत्पादनही अनेक पटींनी वाढणार
नवी दिल्ली: हजारो हातांना काम देण्यासोबतच अगरबत्ती उत्पादनात भारताला आत्मनिर्भर बनविण्यासाठी खादी ग्रामोद्योग आयोगाने आखलेल्या योजनेला केंद्रीय सुक्ष्म, लघू व मध्यम उद्योगमंत्री (एमएसएमई) नितिन गडकरी यांनी मंजुरी दिली आहे. या योजनेचा एक पथदर्शी प्रकल्प लवकरच राबविण्यात येईल व त्यानंतर ही योजना संपूर्ण देशभर पूर्ण क्षमतेने राबविली जाईल.
‘खादी अगरबत्ती आत्मनिर्भर मिशन’असे या योजनेचे नाव असून यामुळे खासगी अगरबत्ती उत्पादकांना स्वत: कोणतीही भांडवली गुंतवणूक न करता स्वत:चे उत्पादन अनेक पटींनी वाढविणे शक्य होईल. शिवाय त्यांच्याकडून स्थलांतरित मजूर व बेरोजगारांसाठी रोजगाराच्या संधीही उपलब्ध होतील.
ही योजना राबविण्यासाठी खादी ग्रामोद्योग आयोग यशस्वी खासगी अगरबत्ती उत्पादकांशी व्यापारी भागिदार म्हणून करार करेल. अगरबत्ती बनविणाऱ्या कारागिरांना दर आठवड्याला पगार देण्याची व पगाराची रक्कम कारागिरांच्या बँक खात्यात थेच जमा करण्याची जबाबदारी या खासगी व्यापारी भागिदाराची असेल.
भारताची अगरबत्तीची रोजची मागणी सुमारे १,४९० टन आहे तर देशात होणारे अगरबत्तीचे दैनंदिन उत्पादन जेमतेम निम्मे म्हणजे ७६० टन आहे. मागणी व उत्पादनातील ही मोठी दरी या योजनेने भरून निघेल.
कारागिरांना यंत्रे देणार
च्आयोग खासगी उद्योजकाच्या माध्यमातून कारागिरांना अगरबत्ती बनविण्याचे स्वयंचलित यंत्र व अगरबत्तीच्या भुकटीचे मिश्रण करण्याचे यंत्र देईल.
च्कारागिरास एक अगरबत्ती बनविण्याचे यंत्र व अशा पाच यंत्रांमागे एक भुकटीचे मिश्रण करणारे यंत्र देईल.
च्या यंत्रांची २५ टक्के किंमत आयोग अनुदान म्हणून स्वत: भरेल. बाकीची ७५ टक्के कारागिरांकडून मासिक सुलभ हप्त्याने वसूल केली जाईल.
या दोन निर्णयांमुळे देशात अगरबत्ती उद्योगात रोजगार उपलब्ध करण्याची मोठी संधी उपलब्ध झाली. याच संधीचा लाभ घेत आम्ही ही योजना गेल्या महिन्यात ही योजना सादरकेली
व मंत्री महोदयांनी ती मंजूर कली.
-विनय कुमार सक्सेना, अध्यक्ष, खादी ग्रामोद्योग आयोग