आता व्हॉट्सअॅपवरुन कोणतीही पाठवा फाईल

By admin | Published: July 14, 2017 02:38 PM2017-07-14T14:38:45+5:302017-07-14T14:53:18+5:30

व्हॉट्सअॅपमध्ये अपडेट करण्यात आले असून युजर्स आता व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून कोणत्याही फॉरमॅटची फाईल पाठवू शकतात.

Now send any file from WhatsAppApps | आता व्हॉट्सअॅपवरुन कोणतीही पाठवा फाईल

आता व्हॉट्सअॅपवरुन कोणतीही पाठवा फाईल

Next
>ऑनलाइन लोकम
मुंबई, दि. 14 - सोशल मीडियात अग्रेसर असणारे व्हॉट्सअॅप आपल्या युजर्ससाठी नेहमीच नव-नवीन फीचर्स देत असते. व्हॉट्सअॅपमध्ये अपडेट करण्यात आले असून युजर्स आता व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून कोणत्याही फॉरमॅटची फाईल पाठवू शकतात. 
गेल्या काही दिवसांपूर्वी व्हॉट्सअॅपने पीडीएफ फॉरमॅटमधील फाईल पाठविण्याचे फिचर्स दिले आहे. सध्या फक्त ही फाईल 100 एमबीपर्यंत पाठविता येऊ शकते. सुरुवातीला व्हॉट्सअॅपने फक्त मेसेजची सुविधा उपलब्ध करुन दिला होता. मात्र, त्यानंतर हळू-हळू फोटो, ऑडिओ क्लिप आणि पीडीएफ फाईल शेअर करण्याची सुविधा दिली.
याचबरोबर पीडीएफनंतर सीएव्ही, डॉक, पीपीटी, पीपीटीएक्स, आरटीएफ, टीएक्सटी आणि एसएसएस यांसारख्या फॉरमॅटच्या फाईल्स पाठविण्याचे फिचर्स दिले आहेत. 
मिळालेल्या माहितीनुसार, आयफोन मोबाईल युजर्स व्हॉट्सअॅपवरुन 128 एमबीपर्यंत फाईल्स पाठवू शकतात. तर, अॅन्ड्राईड मोबाईल युजर्स 100 एमबीपर्यंतची फाईल पाठवू शकतात. त्याचबरोबर व्हॉट्सअॅप वेबवरुन फक्त 64 एमबीपर्यंत फाईल्स पाठविण्याची मर्यादा ठेवली आहे. 
(व्हॉट्सअॅपवर चुकून पाठवलेला मेसेज करा डिलीट, लवकरच येणार नवे फिचर)
(Alert! चुकूनही नका करू अशा व्हॉट्सअॅप मेसेजवर क्लिक)
(आता लवकरच व्हॉट्सअॅप वर शेअर करा काहीही)
दरम्यान, व्‍हॉट्सअॅपवर टाकलेला मेसेज डिलीट किंवा एडिट करण्याच्या फिचरची चाचणी वर्षाच्या सुरूवातीपासून सुरू आहे. मात्र, हे फिचर अजूनपर्यंत व्हॉट्सअॅपवर उपलब्ध करण्यात आलेले नाही. आता हे फिचर लवकरच येणार असल्याचे वृत्त आहे.  व्हॉट्सअॅपने प्रायोगिक तत्त्वावर रिकॉल हे फीचर अॅड केल्याची माहिती "वॅबीटाइन्फो" (WABetaInfo) या ट्विटर हँडलने दिली आहे. iPhone साठी व्हॉट्सअॅपच्या 2.17.30+ व्हर्जनमध्ये हे फिचर लवकरच अॅड केले जाणार असल्याची माहिती  "वॅबीटाइन्फो" (WABetaInfo) ने दिली आहे. पण नक्की हे फिचर कधी येणार याबाबत माहिती दिलेली नाही.  "रिकॉल" या फिचरद्वारे 5 मिनिटांच्या आत पाठवलेला मेसेज परत मिळवण्याची म्हणजेच रिकॉल करण्याची संधी आता व्हॉट्सअॅप उपलब्ध करून देणार आहे.  
 
व्हॉट्सअॅप वापरताना काय काळजी घ्यावी ?
 
1.कुठल्याही अनोळखी लिंक ला क्लिक करू नका . 
2.अनोळखी मित्राने जर काही व्हिडिओ किंवा लिंक पाठविले असल्यास ओपन करू नका .  अथवा शक्य असल्यास कॉल करून लिंक कसली आहे याविषयी खातरजमा करा.
3.तुमच्या कडे जर चुकून काही लिंक आलीच तर तुम्ही ती पुढे फॉरवर्ड करू नका.
4.तुमच्या स्मार्टफोन मध्ये एखादा चांगला अँटीव्हायरस असू द्या .
5.व्हॉट्सअॅप नेहमी अपडेट करत राहा. 

Web Title: Now send any file from WhatsAppApps

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.