व्हॉटस् अॅपवरून आता पाठवा पीडीएफ फाईल
By admin | Published: March 3, 2016 03:44 AM2016-03-03T03:44:16+5:302016-03-03T03:44:16+5:30
तुम्ही जर व्हॉटस् अॅपचा वापर करीत असाल आणि पीडीएफ फाईल पाठविण्यासाठी जर तुम्हाला अडचण येत असेल, तर ही अडचण आता दूर होणार आहे. कारण, व्हॉटस् अॅपने तुम्हाला आता पीडीएफ फाईल पाठविता येणार आहे.
Next
नवी दिल्ली : तुम्ही जर व्हॉटस् अॅपचा वापर करीत असाल आणि पीडीएफ फाईल पाठविण्यासाठी जर तुम्हाला अडचण येत असेल, तर ही अडचण आता दूर होणार आहे. कारण, व्हॉटस् अॅपने तुम्हाला आता पीडीएफ फाईल पाठविता येणार आहे.
व्हॉटस् अॅप हे फेसबुकच्या मालकीचे असून पीडीएफ फाईलनंतर आता अन्य प्रकारच्या फाईल पाठविण्याबाबत अभ्यास सुरू आहे. पीडीएफ फाईल पाठविण्यासाठी नवे व्हर्जन गुगल प्ले स्टोअर्सवर आणि कंपनीच्या स्वत:च्या वेबसाईटवर उपलब्ध आहे.
अलीकडच्या काळात व्हॉटस् अॅपने केलेली ही दुसरी मोठी सुधारणा आहे.
व्हॉटस् अॅपने नुकतेच सांगितले आहे की, त्यांच्या युजर्सची संख्या एक अब्जावर पोहोचली आहे.