आता माजी सैनिकांच्या ‘पदकवापसी’चा सिलसिला

By admin | Published: November 10, 2015 11:00 PM2015-11-10T23:00:09+5:302015-11-10T23:00:09+5:30

‘वन रँक, वन पेन्शन’योजनेबाबत केंद्र सरकारने जारी केलेल्या अधिसूचनेच्या विरोधात निदर्शने करणाऱ्या सुमारे दोन हजारांवर माजी सैनिकांनी मंगळवारी आपली पदके परत केली

Now a series of 'ex-servicemen' medalists | आता माजी सैनिकांच्या ‘पदकवापसी’चा सिलसिला

आता माजी सैनिकांच्या ‘पदकवापसी’चा सिलसिला

Next

चंदीगड/नवी दिल्ली : ‘वन रँक, वन पेन्शन’योजनेबाबत केंद्र सरकारने जारी केलेल्या अधिसूचनेच्या विरोधात निदर्शने करणाऱ्या सुमारे दोन हजारांवर माजी सैनिकांनी मंगळवारी आपली पदके परत केली. दिल्ली, हरियाणा व पंजाबातील अनेक माजी सैनिकांनी संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयांत पदकवापसी करून संबंधित अधिसूचनेस विरोध दर्शवला. दरम्यान, संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी पदकवापसी करणाऱ्या माजी सैनिकांना अप्रत्यक्षपणे फैलावर घेत, हे सैनिकांसारखे काम नसल्याचे म्हटले.
‘वन रँक, वन पेन्शन’संदर्भातील अधिसूचना म्हणजे या योजनेची हत्या आहे. आम्हाला दिलेल्या आश्वासनांपासून फारकत घेण्याचा हा प्रकार आहे. आमचा या अधिसूचनेला विरोध आहे.
हा विरोध नोंदविण्यासाठी देशभरातील माजी सैनिकांनी आपापली पदके परत केली. याउपरही सरकार जुमानणार नसेल तर आम्ही अधिसूचनेविरोधात ‘काळी दिवाळी’ साजरी करू, असे आंदोलकर्त्या माजी सैनिकांचे प्रवक्ते कर्नल (सेवानिवृत्त) अनिल कौल म्हणाले.

Web Title: Now a series of 'ex-servicemen' medalists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.