सिंगल फादर्सना मिळणार 730 दिवसांची भरपगारी बालसंगोपन रजा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2018 12:35 PM2018-12-28T12:35:38+5:302018-12-28T12:49:11+5:30

केंद्र सरकार पुरुष कर्मचाऱ्यांना एक आनंदाची बातमी देण्याची शक्यता आहे.

Now single father central government employees can avail child care leave | सिंगल फादर्सना मिळणार 730 दिवसांची भरपगारी बालसंगोपन रजा

सिंगल फादर्सना मिळणार 730 दिवसांची भरपगारी बालसंगोपन रजा

Next

नवी दिल्ली- केंद्र सरकार पुरुष कर्मचाऱ्यांना एक आनंदाची बातमी देण्याची शक्यता आहे. अशातच ज्या पुरुषांनी पालकत्व स्वीकारलेलं आहे, त्यांना आता चाइल्ड केअर लीव्ह (सीसीएल) मिळणार आहेत. पालकत्व स्वीकारलेल्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना पूर्ण नोकरीच्या काळात ही 730 दिवसांची रजा घेता येणार आहे. आतापर्यंत अशी रजा महिलांनाच देता येत होती. परंतु आता अशा प्रकारची रजा पुरुषांनाही मिळणार आहे. 

महिला कर्मचाऱ्यांना प्रतिवर्षी 3 टप्प्यात मुलांच्या देखभालीसाठी सुट्ट्या दिल्या जातात. परंतु या सुट्ट्यांची मर्यादा फक्त दोन मुलांपर्यंत मर्यादित असते. लग्न न केलेले, घटस्फोट घेतलेल्या पुरुष या चाइल्ड केअर लीव्हसाठी पात्र ठरणार आहेत. तत्पूर्वी महिलांनाच मुलांच्या संगोपनासाठी रजा मिळत होती. परंतु आता पुरुषांनाही तशी रजा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. कार्मिक आणि प्रशिक्षण विभागा(DoPT) नं सरकारी संस्थांना हा प्रस्ताव दिला आहे. या प्रस्तावात सरका महिला कर्मचारी आणि सिंगल पुरुषानं पालकत्व स्वीकारलेलं असल्यास त्यांना 730 दिवसांची रजा मिळाली पाहिजे.

DoPTच्या शिफारशीनुसार, सुरुवातीला 365 दिवसांत 100 टक्के पगार आणि इतर 365 दिवसांत 80 टक्के पगार दिला गेला पाहिजे. पालकत्व स्वीकारलेल्या सिंगल पुरुषाच्या या नियमाला अद्याप स्वीकारलं गेलेलं नाही. पुरुष कर्मचाऱ्याच्या पत्नीनं घटस्फोट घेतला असेल किंवा तिचं निधन झालं असल्यास एकट्याच पुरुषाला मुलांचा सांभाळ करावा लागतो.

Web Title: Now single father central government employees can avail child care leave

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.