आता तासांत नव्हे तर मिनिटांत होईल वैष्णोदेवी प्रवास; सरकारनं घेतला मोठा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2023 06:36 PM2023-02-16T18:36:52+5:302023-02-16T18:37:47+5:30

रोपवे कटरा येथील तारकोट बेस कॅम्पपासून मंदिराजवळील सांझीछतपर्यंत जाईल

Now the journey to Vaishno Devi will be done in minutes, Ropeway will be constructed till Bhavan | आता तासांत नव्हे तर मिनिटांत होईल वैष्णोदेवी प्रवास; सरकारनं घेतला मोठा निर्णय

आता तासांत नव्हे तर मिनिटांत होईल वैष्णोदेवी प्रवास; सरकारनं घेतला मोठा निर्णय

googlenewsNext

कटरा -  जम्मूमध्ये स्थित माता वैष्णोदेवीचे मंदिर हिंदूंसाठी एक पवित्र स्थान आहे. दरवर्षी लाखो भाविक येथे दर्शनासाठी येतात. डोंगरावर असणाऱ्या या मंदिरापर्यंत पोहचण्यासाठी लहान मुले, वृद्ध किंवा दिव्यांग आहेत त्यांना खूप त्रास सहन करावा लागतो. त्यांच्यासाठी हा प्रवास एकतर खर्चिक किंवा कठीण आहे. याठिकाणी रोप वे बांधण्याची अनेक वर्षांपासून मागणी आहे. मात्र आता सरकारने २५० कोटी रुपये खर्चून रोपवे बांधण्याचा प्रकल्प सुरू केला आहे. 

२०२२ मध्ये सुमारे ९१ लाख भाविक मातेच्या दर्शनासाठी आले होते. यातील बहुतेक लोक त्रिकुटा पर्वतावर असलेल्या मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी १२ किमी लांबीच्या ट्रॅकवरून गेले. ज्या भाविकांना पायी भवनपर्यंत जाता येत नाही ते घोड्यांची मदत घेतात. परंतु हे महाग देखील आहे, म्हणून प्रत्येकाला ते परवडत नाही. १२ किमी अंतर पायी कापून परत येण्यासाठी १ दिवस लागतो. आता रोप वेमुळे ही प्रक्रिया काही मिनिटांवर कमी होणार आहे. हा रोपवे २.४ किलोमीटर लांबीचा असेल आणि यासाठी RITES म्हणजेच रेल्वे इंडिया टेक्निकल अँड इकॉनॉमिक सर्व्हिसने निविदा मागवल्या आहेत.

हा रोप-वे तयार झाल्यावर माताच्या दरबारात पोहोचण्यासाठी अवघी ६ मिनिटे लागणार आहेत. आता ५-६ तास लागतात. हा प्रकल्प पूर्ण होण्यासाठी ३ वर्षे लागतील. रोपवे कटरा येथील तारकोट बेस कॅम्पपासून मंदिराजवळील सांझीछतपर्यंत जाईल. हा रोप-वे गोंडोला केबल कार प्रणालीने सुसज्ज असेल. याला एरियल रोप-वे असेही म्हणतात. यामध्ये ताऱ्यांवरील एक केबिन डोंगराच्या मधोमध एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रवास करते. गोंडोला केबल कारमध्ये वायरची दुहेरी व्यवस्था असते.

रोप-वे तयार झाल्यानंतर भाविकांचा वेळ तर वाचेलच, पण खेचर किंवा हेलिकॉप्टरपेक्षा हा पर्याय खूपच स्वस्त असेल. २०१८ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंदिरापर्यंत जाण्यासाठी एका नवीन मार्गाचे उद्घाटन केले होते. याशिवाय २०२० मध्ये वंदे भारत एक्स्प्रेसही दिल्ली ते कटरा सुरू करण्यात आली होती.

Web Title: Now the journey to Vaishno Devi will be done in minutes, Ropeway will be constructed till Bhavan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.