आता 'प्लास्टिक बॉटल'पासून बनणार गणवेश, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुढाकार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2023 10:14 AM2023-02-07T10:14:56+5:302023-02-07T10:15:41+5:30

ऊर्जा क्षेत्रात भारत सातत्याने प्रगती करत आहे. ऊर्जा क्षेत्रात देशाची ताकद सातत्याने वाढत आहे.

Now the uniform will be made from plastic bottles the initiative of Prime Minister narendra modi | आता 'प्लास्टिक बॉटल'पासून बनणार गणवेश, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुढाकार

आता 'प्लास्टिक बॉटल'पासून बनणार गणवेश, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुढाकार

googlenewsNext

नवी दिल्ली- 

ऊर्जा क्षेत्रात भारत सातत्याने प्रगती करत आहे. ऊर्जा क्षेत्रात देशाची ताकद सातत्याने वाढत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बेंगळुरूमध्ये 'इंडिया एनर्जी वीक'चे उद्घाटन केले. कालच पंतप्रधान मोदींनी ट्विट करून या कार्यक्रमाची माहिती दिली होती. ६ ते ८ फेब्रुवारी दरम्यान भारत ऊर्जा सप्ताह साजरा केला जात आहे. येथे पंतप्रधान अनेक कार्यक्रमांमध्ये सहभागी होतील, ज्यामध्ये ते बहुप्रतिक्षित E-20 योजना देखील सुरू करणार आहेत.

देशातील सर्वात मोठी पेट्रोलियम कंपनी इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (IOC) अर्थव्यवस्था कार्बनमुक्त करण्यासाठी दरवर्षी १०० दशलक्ष टाकाऊ मिनिरल वॉटर, कोल्ड ड्रिंक्स आणि इतर पेट (PET) बाटल्यांचा पुनर्वापर करत आहे. या बाटल्यांपासून पेट्रोल पंप आणि LPG एजन्सींवर तैनात कर्मचाऱ्यांसाठी गणवेश तयार केला जाणार आहे. 

प्लास्टिकच्या बाटलीपासून बनवलेले कपडे होणार लॉन्च
IOCL च्या अनबॉटल उपक्रमाअंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी कपडे आणि गणवेश लॉन्च करणार आहेत. प्रत्येक गणवेश पुनर्वापर केलेल्या अंदाजे २८ वापरलेल्या पीईटी बाटल्यांपासून बनवला जातो. सिंगल यूज प्लॅस्टिक बंद करण्याच्या पंतप्रधानांच्या संकल्पनेनुसार, इंडियन ऑइलने रिटेल ग्राहक अटेंडंट आणि एलपीजी वितरण कर्मचार्‍यांसाठी गणवेश डिझाइन केले आहेत. ते पुनर्नवीनीकरण पॉलिस्टर (RPET) आणि कापसापासून बनवले जातात. इंडियन ऑइलच्या ग्राहक-अटेंडंट गणवेशाचा प्रत्येक सेट पुनर्वापर केलेल्या अंदाजे २८ वापरलेल्या PET बाटल्यांपासून बनवला जातो.

सर्वसामान्यांना अधिक किफायतशीर आणि पर्यावरणपूरक स्वयंपाकाचा पर्याय देण्यासाठी कंपनीने होम कुकिंग स्टोव्ह देखील सादर केले आहेत. हा स्टोव्ह सौर उर्जेवर तसेच सहायक उर्जा स्त्रोतांवर चालवता येतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंडिया एनर्जी वीकच्या उद्घाटन समारंभात IOC अनबॉटल युनिफॉर्मचे अनावरण केले. यासोबतच त्यांनी व्यावसायिक पद्धतीने स्वयंपाक करण्याची इनडोअर कुकिंग सिस्टिमही सुरू केली.

"इनडोअर सोलर कुकिंगची सुरुवात केल्याने हरित आणि स्वच्छ स्वयंपाक प्रणालीला एक नवा आयाम मिळेल. नजीकच्या काळात हा स्वयंपाकाचा स्टोव्ह तीन कोटी कुटुंबांपर्यंत पोहोचेल", असं पंतप्रधान मोदी म्हणाले. अनबॉटल अंतर्गत १० कोटी प्लास्टिक बाटल्यांचा पुनर्वापर केला जाईल, ज्यामुळे पर्यावरणाचे रक्षण होण्यास मदत होईल. या कार्यक्रमात पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी म्हणाले की, आम्ही ऊर्जा कार्यक्षमतेवर लक्ष केंद्रित करत आहोत. हायड्रोजनसह भविष्यातील इंधन आणि अक्षय ऊर्जेचा वापर वाढवण्यावर आमचा भर आहे.

Web Title: Now the uniform will be made from plastic bottles the initiative of Prime Minister narendra modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.