ड्रायव्हिंग टेस्टसाठी आता आरटीओत जाण्याची गरज नाही, १ जूनपासून लागू होणार नवे नियम

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2024 03:08 PM2024-05-22T15:08:42+5:302024-05-22T15:14:37+5:30

रस्ते परिवहन व महामार्ग मंत्रालयाने जारी केलेले नवे नियम १ जूनपासून लागू होणार आहे. त्याशिवाय मंत्रालयाने अन्य काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहे.

Now there is no need to go to RTO for driving test | ड्रायव्हिंग टेस्टसाठी आता आरटीओत जाण्याची गरज नाही, १ जूनपासून लागू होणार नवे नियम

ड्रायव्हिंग टेस्टसाठी आता आरटीओत जाण्याची गरज नाही, १ जूनपासून लागू होणार नवे नियम

नवी दिल्ली : वाहन चालविण्यासाठी आवश्यक असणारे लायसन्स काढण्यासाठी आरटीओत जाऊन ड्रायव्हिंग टेस्ट देणे आवश्यक होते. परंतु आता आरटीओत न जाता प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांमध्येच ही टेस्ट देता येणार आहे. त्यासाठी ठराविक संस्थांना मान्यता दिली जाणार आहे. रस्ते परिवहन व महामार्ग मंत्रालयाने जारी केलेले नवे नियम १ जूनपासून लागू होणार आहे. त्याशिवाय मंत्रालयाने अन्य काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहे.

किती शुल्क लागणार? 
लर्निंग लायसन्स :    १५० रुपये
लर्निंग लायसन्स चाचणी शुल्क :     ५० रुपये
ड्रायव्हिंग टेस्ट शुल्क :     ३०० रुपये
ड्रायव्हिंग लायसन्स :     २०० रुपये
लायसन्स नूतनीकरण :     २०० रुपये
दुसऱ्या वाहनाचे अतिरिक्त लायसन्स :     ५०० रुपये

नवे नियम
- किमान १ एकर भूखंड आवश्यक (चारचाकीसाठी २ एकर)
- ड्रायव्हिंग टेस्ट देण्यासाठी
पुरेशी सुविधा
- प्रशिक्षक हा किमान १२ वी उत्तीर्ण
व पाच वर्षांचा अनुभव असावा
- हलक्या वाहनांसाठी ४ आठवड्यात २९ तासांचे प्रशिक्षण (८ तास थेअरी   २१ तास प्रात्यक्षिक)
- अवजड वाहनांसाठी ६ आठवड्यात ३९ तासांचे प्रशिक्षण (८ तास थेअरी   ३१ तास प्रात्यक्षिक)

आणखी कोणते नवे नियम लागू होणार? 
जुने वाहने बाद :  प्रदूषण करणारे सुमारे ९ लाख जुने सरकारी वाहने सेवेतून बाद ठरविण्यात येणार आहे.
कठोर दंड : वाहनचालक अल्पवयीन आढळल्यास तब्बल २५ हजारांचा दंड ठोठावला जाईल. तसेच त्यास २५ व्या वर्षापर्यंत लायसन्स दिले जाणार नाही. तसेच वाहनमालकांची नोंदणी रद्द केली जाईल.   
सुलभ अर्ज प्रक्रिया : लायसन्स काढण्याची प्रक्रिया सुलभ केली जाणार आहे. वाहनाच्या प्रकारानुसार मोजकेच कागदपत्रे लागणार आहेत.

कागदपत्रां साठी https://parivaha- .gov.i- /. या संकेतस्थळावर अर्ज करता येणार आहे. कागदपत्रे सादर करण्यासाठी व ड्रायव्हिंग टेस्ट देण्यासाठी मात्र आरटीओ कार्यालयात येण्याची आवश्यकता नसल्याचे सांगण्यात आले.

Web Title: Now there is no need to go to RTO for driving test

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.