Traffic Rule: आता कार चालवताना फोनवर बोलल्यास होणार नाही दंड, केवळ एक अट पाळावी लागणार असा आहे नवा नियम
By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2022 03:19 PM2022-01-20T15:19:35+5:302022-01-20T15:20:07+5:30
Traffic Rule, Motor Vehicle Act : आता कार चालवत असताना मोबाईल फोनवर बोलल्यास ट्रॅफिक पोलीस तुम्हाला दंड करू शकणार नाहीत सरकारने स्वत:ही माहिती दिली आहे. जर कुण्या ट्रॅफिक पोलीस कर्मचाऱ्याने तुमच्यावर दंडात्मक कारवाई केली, तर तुम्ही त्याच्यावर कायदेशीर कारवाई करू शकता.
नवी दिल्ली - आता कार चालवत असताना मोबाईल फोनवर बोलल्यास ट्रॅफिक पोलीस तुम्हाला दंड करू शकणार नाहीत सरकारने स्वत:ही माहिती दिली आहे. जर कुण्या ट्रॅफिक पोलीस कर्मचाऱ्याने तुमच्यावर दंडात्मक कारवाई केली, तर तुम्ही त्याच्यावर कायदेशीर कारवाई करू शकता.
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले की, सध्याच्या ट्रॅफिक नियमांनुसार कार चालवताना जर कुणी हँडफ्री कम्युनिकेशन फिचरचा वापर करून आपल्या फोनवर बोलत असेल तर तो दंडनीय गुन्हा ठरणार नाही. त्यासाठी ड्रायव्हरला कुठल्याही प्रकारचा दंडही भरावा लागणार नाही.
लोकसभेमध्ये केरळमधील एर्नाकुलम येथील काँग्रेस खासदार हिबी ईडन यांनी या संदर्भातील प्रश्न विचारला होता. मोटर व्हेईकल अॅक्ट २०१९ (Moter Vehicle Act 2019) च्या सेक्शन १८४ (ग) मध्ये मोटार वाहनांमध्ये हँडफ्री कम्युनिकेशन फीचरच्या वापरासाठी कुठल्या दंडाची तरतूद आहे का, अशी विचारणा त्यांनी केली होती. त्याला उत्तर देताना गडकरी यांनी सांगितले की, या कायद्यान्वये वाहन चालवताना हँड हेल्ड कम्युनिकेशन उपकरणांच्या वापरासाठी कुठल्या दंडाची तरतूद आहे का, अशी विचारणा केली होती. त्याला उत्तर देताना गडकरी यांनी सांगितले की, या कायद्यामध्ये मोटार वाहन चालवताना हँड हेल्ड कम्युनिकेशन उपकरणांच्या वापरावर दंडाची तरतूद आहे. हँडफ्री कम्युनिकेशन उपकरणांच्या वापरावर कुठल्याही प्रकारच्या दंडाची तरतूद नाही.
मोटार व्हेईकल अॅक्ट २०१९ अन्वये हेल्मेट न घालणाऱ्यांवर १ हजार रुपयांचा दंड होऊ शकतो. त्याशिवाय तुमचे ड्रायव्हिंग लायसनही मोटार व्हेईकल अॅक्टच्या कलम १९४ सी अन्वये तीन महिलांच्या काळासाठी सस्पेंड होऊ शकते.