आता दिवसाढवळ्या सुटाबूटात चोर येतात - राहुल गांधींचा टोला
By admin | Published: May 12, 2015 03:21 PM2015-05-12T15:21:47+5:302015-05-12T15:25:40+5:30
आता चक्क दिवसाढवळ्या सर्वांसमक्ष सुटाबूटात चोर येतात अशा शब्दात काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी भूसंपादन विधेयकावरुन भाजपावर निशाणा साधला आहे.
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १२ - चोर रात्री अंधारात, खिडकीतून उडी मारुन यायचा असं पूर्वी वाटायचं. पण आता चक्क दिवसाढवळ्या सर्वांसमक्ष सुटाबूटात चोर येतात अशा शब्दात काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी भूसंपादन विधेयकावरुन भाजपावर निशाणा साधला आहे.सत्ताधा-यांना भूसंपादन विधेयकाच्या माध्यमातून शेतक-यांची जमीन उद्योजकांना देण्याचा घाट घालत आहे असा आरोपही त्यांनी केला आहे.
मंगळवारी लोकसभेत भूसंपादन विधेयकावर चर्चा झाली. या चर्चेत उपाध्यक्ष राहुल गांधींनी सत्ताधा-यांवर जोरदार टीका केली. जमीन ही शेतक-यांसाठी सोनं आहे, पण सत्ताधा-यांना शेतक-यांचे सोनंच हवं आहे असे त्यांनी सांगितले. २०१३ मध्ये युपीएच्या भूसंपादन विधेयकाला सुषमा स्वराज, लालकृष्ण आडवाणी यांनीदेखील समर्थन दिले होते. पण आता त्यांनी यूू टर्न का घेतले हे समजत नाही. बहुधा घाबरुन ते आता काही बोलत नसावेत असेही त्यांनी सांगितले. सत्ताधा-यांनी लोकसभेत हे विधेयक मंजूर करवून घेतले तर रस्त्यावर उतरून त्यांना थांबवू असा इशाराच त्यांनी दिला.