आता महिलांना कुत्रे पकडण्याचं प्रशिक्षण

By admin | Published: September 8, 2016 04:19 PM2016-09-08T16:19:19+5:302016-09-08T16:19:19+5:30

भटक्या कुत्र्यांच्या नसबंदीकरणासाठी त्यांना पकडण्याचे प्रशिक्षण महिलांना देण्याचा उपक्रम

Now training dogs for women | आता महिलांना कुत्रे पकडण्याचं प्रशिक्षण

आता महिलांना कुत्रे पकडण्याचं प्रशिक्षण

Next
>-ऑनलाइन लोकमत
कोच्ची, दि. 8 - भटक्या कुत्र्यांच्या नसबंदीकरणासाठी त्यांना पकडण्याचे प्रशिक्षण महिलांना देण्याचा उपक्रम केरळमध्ये राबवण्यात येणार आहे.  महिला सबलीकरणासाठी केरळमध्ये 'कुदुम्बश्री' हा प्रकल्प राबविला जातो. याद्वारे  एक अभिनव अभियान हाती घेण्यात आलं आहे. कुत्र्यांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी त्यांची नसबंदी करण्यात येणार आहे. त्यासाठी महिलांना कुत्रे पकडण्यासाठीचं खास प्रशिक्षण देण्यात येणार आहे.  
 
या प्रकल्पाला प्रशासकीय मान्यता लवकरच मिळणार असून या पायलट प्रोजेक्टची अंमलबजावणी एर्नाकुलम येथे होईल.
स्थानिक संस्थांद्वारे प्राणी जन्म नियंत्रणात ठेवण्यासाठी या महिलांचा उपयोग करण्यात येणार आहे. कोचीमध्ये या पायलट प्रोजेक्टची सुरूवात होणार असून पहिल्या टप्प्यात 20 महिलांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तसेच या महिलांना प्रथमोपचार आणि पशुवैद्यकीय प्रशिक्षण देखील देण्यात येणार आहे, जेणेकरून भटक्या कुत्र्यांच्या नसबंदीसाठीची शस्त्रक्रिया त्या करू शकतात. 
 
कुदुम्बश्रीच्या एका वरिष्ठ अधिका-याने याबाबत माहिती देताना सांगितले की, कुत्रे पकडण्याचे काम करण्यासाठी महिला उमेदवार शोधणे हे सोप्पे काम नव्हते, यासाठी संपूर्ण शारीरिक तंदुरुस्ती आणि आत्मविश्वास  असणे गरजेचे असते.  प्राणी जन्म नियंत्रणात ठेवण्यासाठीचे कार्यक्रम लवकरच संपूर्ण राज्यभर राबवण्यात येणार आहे  यामुळे महिलांना रोजगाराची जास्त संधी उपलब्ध होणार असल्याचंही ते म्हणाले.   
 
भटके कुत्रे हे मुळात मित्रवत असतात आणि पुरूषांपेक्षा ते जास्त महिलांवर विश्वास ठेवतात.  कुत्रे पकडण्यासाठी तुमच्यासोबत जर कोणी महिला असेल तर तुमचे काम अधिक सोप्पे होते असं मला नेहमीच वाटतं असं सॅली कन्नन या प्राणी जन्म नियंत्रण कार्यक्रमाच्या व्यवस्थापिका म्हणाल्या. 
 

Web Title: Now training dogs for women

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.