आता तृणमूल काँग्रेसने थेट सीबीआयविरोधात दाखल केला गुन्हा, केले असे आरोप 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2021 06:53 PM2021-05-19T18:53:06+5:302021-05-19T18:53:43+5:30

TMC file FIR against CBI: नारदा स्टिंग ऑपरेशन खटल्यात अडकलेल्या टीएमसी नेत्यांना आज जामीन मिळू शकला नाही. यादरम्यान तृणमूल काँग्रेसकडून थेट सीबीआयविरोधातच तक्रार दाखल कऱण्यात आली आहे.

Now the Trinamool Congress has filed a case directly against the CBI | आता तृणमूल काँग्रेसने थेट सीबीआयविरोधात दाखल केला गुन्हा, केले असे आरोप 

आता तृणमूल काँग्रेसने थेट सीबीआयविरोधात दाखल केला गुन्हा, केले असे आरोप 

Next

कोलकाता - नारदा स्टिंग ऑपरेशन खटल्यात अडकलेल्या टीएमसी नेत्यांना आज जामीन मिळू शकला नाही.  (TMC file FIR against CBI) आता या प्रकरणातील चारही आरोपींच्या जामीनावर उद्या पुन्हा कोलकाता हायकोर्टात सुनावणी होणार आहे. यादरम्यान तृणमूल काँग्रेसकडून थेट सीबीआयविरोधातच तक्रार दाखल कऱण्यात आली आहे. तृणमूलकडून करण्यात आलेल्या तक्रारीच्या आधारावर कोलकाता पोलिसांनी सीबीआयविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांना सीबीआयने केलेली अटक ही अवैध असल्याचा दावा तृणमूलकडून करण्यात आला आहे. (Now the Trinamool Congress has filed a case directly against the CBI)

१७ मे रोजी ज्या दिवशी सीबीआयने नारदा स्टिंग प्रकरणात तृणमूल काँग्रेसच्या तीन वरिष्ठ नेत्यांना अटक करण्यात आली. त्याच दिवशी तृणमूल काँग्रेसने सीबीआयविरोधात तक्रार दाखल केली होती. पश्चिम बंगाल सरकारमधील वरिष्ठ मंत्री चंद्रिमा भट्टाचार्य यांनी कोलकाता पोलीस मुख्यालय लालबाजारमध्ये सीबीआयविरोधात तक्रार दाखल केली. तसेच सीबीआयकडून नेत्यांना करण्यात आलेली अटक अवैध असल्याचा आरोप केला. दरम्यान, या तक्रारीच्या आधारावर कोलकाता पोलिसांनी आज सीबीआयविरोधात गुन्हा दाखल केला आहे. 

दरम्यान, मंत्री चंद्रिका भट्टाचार्य यांनी आपल्या तक्रारीमध्ये म्हटले आहे की, तृणमूलच्या नेत्यांना करण्यात आलेली अटक अवैध होती कारण या अटकेच्या कारवाईसाठी विधानसभा अध्यक्षांकडून कुठल्याही प्रकारची परवानगी मागण्यात आली नव्हती. एका आमदाराच्या अटकेसाठी विधानसभा अध्यक्षांची परवानगी घेणे आवश्यक असते. तसेच या तक्रारीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इशाऱ्यावरून नेत्यांना अटक करणाऱ्या सीबीआयच्या अधिकाऱ्यांविरोधात कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली आहे. 

दुसरीकडे रदा स्टिंग प्रकरणामध्ये सीबीआय सध्याचे भाजपा नेते आणि तृणमूल काँग्रेसचे माजी खासदार सुवेंदू अधिकारी यांच्यासह चार नेत्यांवर खटला चालवण्यासाठी लोकसभा अध्यक्षांच्या परवानगीच्या प्रतीक्षेत आहे. सीबीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने मंगळवारी याबाबतची माहिती दिली. तसेच काही लोकांकडून संस्थेविरोधात होत असलेले पक्षपाताचे आरोपही फेटाळून लावले आहेत. 

Web Title: Now the Trinamool Congress has filed a case directly against the CBI

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.